या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवाल्मीकि राजा, मुनि वसिष्ठ इतकें सागत आहेत तो सूर्यास्त समय झाला आणि त्यामुळे मुनीचा अमृततुल्य उपदेश ऐकण्याची उत्कट इच्छा असतांनाही नित्यकर्माचा लोप होऊ नये ह्मणून सभासद स्वस्व- स्थानी गेले व दुसऱ्या दिवशी सर्व प्रातःकृत्ये आटोपून ते पुनः सभेत येऊन बसले. ( येथे आठवा दिवस समाप्त झाला ) श्रीवसिष्ठ-राघवा, हे मन परमात्म्यापासून अनर्थ करण्याकरितांच उत्पन्न झाले आहे. ते आपल्या अचित्य सामोने आत्म्यास अनात्मा व अनात्म्यास आत्मा करितें. टीचभर लाबरुद पदार्थास केवळ कल्पनेने तें मोठ्या पर्वताएवढा करिते. त्यामध्ये हे असे विचित्र सामर्थ्य कोठून आले ? ह्मणून ह्मणशील तर सांगतो. परम पदापासून ते लब्ध-प्रतिष्ठ झाले आहे. ह्मणजे ब्रह्माच्या सत्तेने ते विचित्र शक्तियुक्त झाले आहे, व त्या कारणा- नेच ते एका निमेषांत ससारास रचितें, व नाहीसे कारते. अनुभवास येणारे हे सर्व स्थिर-चर जग या मनामुळेच स्थित झाले आहे. ते एकाद्या नटाप्रमाणे क्षणोक्षणी आपले आकार बदलते प्राण्याचे हस्तपादादि सर्व अवयव या विलक्षण मनाच्याच अधीन असतात. त्यामुळे त्या( मना )स हवें असेल तेच ते ( अवयव ) घेतात. व त्याला नको असेल त्याचा त्याग कारतात. बालक आपल्या इच्छेप्रमाणे मातीची जशी अनेक खेळणी बनविते त्याप्रमाणे मन जगातील पदार्थास बनविते. यास्तव सोने विकत घेणारा सोनार दागिन्याच्या आकाराकडे लक्ष न देता सोन्याकडेच जसे ते देतो त्याप्रमाणे विवेकी पुरुषाने जग, भुवने, वने इत्यादि सर्व मनोमात्र आहे, असे पहावें. पदार्थाच्या निरनिराळ्या आकाराकडे लक्ष देऊ नये १०२, १०३. सर्ग १०५-या सर्गात लवणाख्यानास आरंभ केला आहे. लवण राजाचे गुण, ऐंद्रजालिकाचे व अश्वपालकाचे आगमन, अश्वदर्शन व त्यामुळे झालेली चमत्कारिक स्थिति यांचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामचद्रा, याविषयी मी तुला एक उत्तम वृत्तात सागतो. न्याच्या श्रवणाने जगाची चमत्कारिक स्थिति चित्ताच्याच अधीन कशी आहे ते तुला चांगले समजेल. या पृथ्वीच्या पाठीवर उत्तरा-पाडव ह्मणून एक मोठा देश होता. तो पर्वत, वने, नद्या, नगरे, पत्तने, ग्राम, पशु, पक्षी, सर्व जातीचे व वर्णाश्रमसपन्न लोक, यानी सपन्न होता. शेती,