या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०४. ४४५ व्यापार, नानाप्रकारच्या कला इत्यादिकांची तेथे अतिशय समृद्धि होती. पुष्पें, फळे, मूळे, इत्यादि उपभोग्य वस्तूची तेथे कधी वाण नसे. त्या देशात हरिश्चद्राच्या कुलात उत्पन्न झालेला लवण नावाचा एक अति धार्मिक राजा होता. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे त्याचे यश सर्व भूमीवर पसरले होते. त्याच्या प्रभावामुळे त्यास कोणी शत्रुच नव्हता. भगवान् विष्णूच्या चरित्राप्रमाणे त्याचे प्रजापालनरूप चरित्र लोक मोठ्या आदराने ऐकत असत. फार काय, पण स्वर्गलोकी अप्सराही त्याची कीर्ति गात असत. त्याचे औदार्य व अदैन्य हे गुण प्राय. दुसऱ्या कोणत्याही राजाचे ठायीं आढळत नव्हते. कपट झणजे काय, हे तो जाणतही नसे. अनम्रता त्यास कधी स्पर्शही करीत नसे. असो, एकदा चार घटिका दिवस आला असता तो राजा आपल्या रम्य सभेत सिंहासनावर येऊन बसला. त्याबरोबर सभेतील इतर मान- करीही आपापल्या स्थानी विराजमान झाले. स्त्रिया गावू लागल्या. मृदंग, वीणा, मुरली इत्यादिकाचे रमणीय बनि श्रवणेद्रियास सुख देऊ लागले. चामरे धारण करणाऱ्या स्त्रिया राजावर चवऱ्या वारू लागल्या. गुरु व शुक्र याच्यासारखे तेजस्वी व सुज्ञ मत्री राजाच्या बाजूस बसले. भाट त्या महाराजाची स्तुति करूं लागले व येणेप्रमाणे त्या भव्य सभेत मोटें कौतुक चाललें. इतक्यात एक ऐंद्रजालिक (मायावी, गारुडी) चमत्का- रिक वेष धारण करून मोठ्या ऐटीनें सभेत आला. त्या धृष्ट पुरुषाने थेट राजाच्या समोर अगदीं समीप जाऊन त्यास मोठ्या नम्रपणे वदन केलें व हात जोडून झटले, " राजन् , मी एक आपल्यास मिथ्या कौतुक क्रीडा ( जादूचा खेळ ) करून दाखवितो. ती आपण स्वस्थानी बसूनच पहावी." इतके बोलून त्याने लागलाच आपल्या हातांतील मोरांच्या पिसाचा कुचला आपल्या भोवती फिरविला. परमात्म्याच्या माये- प्रमाणेच ती पिच्छिका प्राण्यास भ्रम पाडणारी होती. त्याने तिला फिरविताच ती तेजाने व्याप्त असल्यासारखी त्या राजास दिसली. इतक्यात एक अश्वपालक सभेत आला. त्याच्या मागून एक घोडा येत होता. तो अतिशय देखणा असून मोठा चपलही होता. त्याचे लगाम हातात धरून तो अश्वपालक राजास ह्मणाला, " राजा इंदाच्या उच्चैःश्रवासारिखा हा घोडा फार चपळ आहे. वायूसारिखा वेगवान