या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१८ बृहद्योगवासिष्ठसार. प्रार्थना केली. दयाळु ब्रह्मदेव त्याच्यावर कृपा करण्याकरितां आला व इद्राच्या मायिक सृष्टीचा ध्वस करू लागला. परतु इद्राने प्रार्थना केल्या- मुळे त्याने जसे त्या मायिक सृष्टीचे थोडा वेळ कौतुक पाहिले त्याप्रमाणे मी याच्या मायिक सृष्टीचा चमत्कार पाहिला आहे, तो तुझांस सागतो. असे बोलून व सर्व सभा तो ऐकण्याविषयी अतिशय उत्सुक झाली आहे. असें पाहून राजा असे सागू लागला १०५. सर्ग १०६-या सर्गात अश्वाने वनात नेलेल्या आपला चाडाल कन्येशी विवाह ___ कसा झाला, ते राजा सागेल. राजा-सभासदानों, विविध पदार्थ, नद्या, समुद्र, वने, पर्वत इत्यादिकानी भरलेला व त्यामुळेच या पृथ्वीमडलाचा जणु काय सख्खा धाकटा भाऊच, असा हा एक प्रदेश आहे. त्यात हा मी पौरजनाच्या मनाप्रमाणे वागणारा राजा असून इद्र जसा स्वर्गात बसतो त्याप्रमाणे मी या तुमच्या सभेत स्थित आहे. इतक्यात रसातलातून वर आलेल्या मया सुराप्रमाणे हा शाबरिक ( मायावी, गारुडी) येथे आला. याने ही (पिसाची जुडी) फिरविली व तिला इद्रधनुष्याप्रमाणे तेजोमय केले, नतर मला एक घोडा दिसला. याच्या व त्या घोड्याच्या पालकाच्य सागण्यावरून मी एकटाच त्याच्या पाठीवर आरुढ झालो. तो अश्व प्रलय कालच्या मेघाप्रमाणे चपल होता. त्याच्यावर बसून मृगया करण्या- करिता ह्मणून मी निघालो. सकृद्दर्शनी रमणीय वाटणाऱ्या विषयाच्या अभ्यासाने जड झालेले मन अज्ञास जसे स्वार्थापासून फार दूर नेते त्याप्रमाणे त्या वायुतुल्य अश्वाने मला फार दूर नेले. निष्कांचन यतीच्य मनाप्रमाणे शून्य, स्त्रीचित्ताप्रमाणे लघु, विषम ( कठिण) प्रलयसमयी जळलेल्या ब्रह्माडाप्रमाणे भयकर, पक्षिरहित, वृक्षरहित, जलरहित, अति शीतसपन्न व अनंत अशा एका अरण्यात मी पोचलो. त्यावेळी माझा तो घोडाही फार थकला होता. तें अरण्य ज्ञानी पुरुषाच्या ब्रह्ममय चित्ताप्रमाणे विस्तृत, मूर्खाच्या क्रोधाप्रमाणे दुर्गम, जनससर्गरहित व ज्यांत तृण आणि पल्लवही उगवलेले नाहीत, असे होते. ते प्रति आकाशच आहे. अथवा आठवा सागर आहे, असे मला क्षणभर वाटले. अन्न, फळे, मूळे यांसही महाग झालेल्या आप्त-इष्टरहित व अठरा विसवे दारिद्य भोगणान्या लटनेप्रमाणे असलेलें तें अरण्य पाहून माझी मति खिन्न झाली.