या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० बृहद्योगवासिष्ठसार. पक्ष्याप्रमाणे, लपून बसलो. मोहांत मन झालेल्या मला ती रात्र कल्पाएवढी मोठी वाटली. त्या दिवशी स्नान नाहीं, पूजन नाही व भोजनही नाही. रात्री निद्रा नाही. जरा कोठे पानाचाहि जरी ध्वनि झाला तरी माझ्या उरात धस्स होत असे. पण कोणताही काल स्थिर रहाण्याकरिता येत नसतो; या न्यायाने पहाट झाल्याचा मला भास झाला. कारण दुष्ट प्राण्यांचा सुळसुळाट कमी होऊन ते अरण्य आता अगदी शात झाले होते. तेव्हां सुमारे चार प्रहर लपवून ठेविलेले व वामाने डवडवलेले मुख जरा वर करून मी बाहेर डोकावलें तो पूर्वदिशा भारक्तवर्ण व उज्ज्वल झाली आहे असे माझ्या दृष्टोत्पत्तीस आले. शीतल वायूचाही स्पर्श मला सुखवू लागला. पुष्पसुगधानेही माझी योग्य सेवा केली. मी अगदी प्रथम जेव्हा सुप्रभात पूर्वदिग्वधूकडे पाहिले तेव्हा ती अबला माझ्या या भितया स्वभावास हसतच आहे, असे मला वाटले. असो, नतर थोड्याच अवकाशाने, अज्ञाला ज्ञान किंवा दरिद्याला मवर्ण जसे मिळावे त्याप्रमाणे मला भगवान् सूर्याचे चिरकाक्षित दर्शन झाले. पापाची निवृत्ति झाली असता व पुण्य वाढले असता मानवाचे चित्त जसे निर्भय होते त्याप्रमाणेच माझे मन त्यावेळी निर्भय झाले. रात्रीची भीति पार निघून गेली व राहून राहून मला त्या माझ्या अवस्थेचे माश्चर्यही वाटले. पण प्रसग पडल्याने मनुष्य अधिकाधिक सहिष्णु होतो, असें ह्मणतात तें खोटें नव्हे. 'मला आजन्म असा घोर प्रसग ठाऊक नव्हता व त्यामुळे तो काल दुःसह झाला. पण आज पुनः तसा प्रसग आल्यास भ्यावयांचे नाही' असा निश्चय करून मी वृक्षावरून खाली उतरलों व त्या वनात पायानींच चोहोंकडे हिडू लागलो. तें अर- ण्यही अतिशय मोठे होते. मी चारी दिशेत दूरवर चालून गेलो. पण भूर्खाच्या शरीरात उत्तम गुण जसे आढळत नाहीत त्याप्रमाणे मला तेथें कोणी भेटले नाही. केवल या वृक्षावरून त्या वृक्षावर व त्या वृक्षावरून या वृक्षावर निर्भयपणे उडणारे व " ची ची" शब्द करणारे अनेक पक्षी आढळले. पण एक प्रहरभर दिवस येऊन दव सुकून गेला असतां व त्यामुळे त्या अरण्यातील वेली जणुकाय स्नान करून निर्मल झाल्या असा त्याच्या बाजू बाजूनें एक कन्या एका हातात अन्नाचे परळ व दुसऱ्या हातात पाण्याचे मडके घेऊन हळु हळु येत आहे, असे मला दिसलें.