या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०७. ४५३ मला मोठ्या आदराने आसन आणून दिले. त्यावर मी बसलो. आमचे भावी श्वशुर व पत्नी घरांत गेली. त्याचे सेवक बैलांस बांधण्याकरितां गोव्यांत घेऊन गेले व एक क्षणार्धातच आमची सास बाहेर आली. तिचे ते लाल व मोठे डोळे, काळाकुट्ट वर्ण, कर्कश ध्वनि, पिंजारलेले केस व अस्ताव्यस्त वस्त्र यास पाहताच माझें अंग थरथर कापू लागले. पण मला पाहून तिला मोठे समाधान वाटले व ती आसपासच्या आपल्या मैत्रिणीना हाका मारमारून हा आमचा जामात पहा ह्मणून मोठ्या कौतुकाने त्यास दाखवू लागली. काही वेळाने भोजनाची वेळ झाली व एका चामड्यावर वाढलेले अन्न मला खावयास दिले. पापी पुरुष आपली दुष्कमें जशी भोगतो त्याप्रमाणे मी ते अन्न फस्त केले. माझा-भावी श्वशुर, सासू व पत्नी-याची प्रेमाची वचने मी अगदी अप्रसन्न मनाने ऐकत होतो. काही दिवसानी विवाह समारभ झाला. त्या चाडालांनी आपल्या पद्धती- प्रमाणे आमचा सर्व सोहळा केला व सापळ्यात पडलेला व्याघ्र जसा पोराची हवी ती चेष्टा मुकाव्याने सहन करतो त्याप्रमाणे मी तें सर्व सहनही केले. माझ्या श्वशुराचे भाऊबध मद्य प्राशन करून उन्मत्त झाले व त्यानी गाणे, ढोल वाजविणे, नाचणे, अपशब्दाचा उच्चार करणे, व प्रसगीं एकमेकात मारामारीही करणे या निद्य कृत्यानीं आमन्या मंगलकार्यास शोभा आणिली १०६. सर्ग १०७-या सर्गात राजा, आपले तेथे साट वर्षे झालेले वास्तव्य व त्या जातीस उचित अशी केलेली कर्मे याचे वर्णन करतो. राजा-सभासदहो, फार काय सागू ? सात दिवस अहोरात्र चाल- लेल्या त्या विवाहोत्सवानें माझें चित्त सर्वस्वी त्याच्या अधीन झाले व मी पुष्ट चाडाल बनलो. पुढे आठ महिने लोटतात न लोटतात तो ती माझी भार्या गर्भवती झाली. विपत्तीपासून जशी दुखक्रिया उद्भवते त्याप्रमाणे तिला एक दुःखद कन्या झाली. मूर्खाच्या चितेप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली. तिला तीन वर्षे होत आहेत तों, दुर्बुद्धि जशी आशापाशात बाघून टाकणान्या अनर्थास जन्म देते त्याप्रमाणे त्या चाडाल-कन्येस पुत्र झाला. पुनः आणखी काही दिवसानी दुसरी कन्या झाली. तिच्या पाठीवर आणखी एक कन्या झाली. पुनः पुत्र झाला. याप्रमाणे मी त्या वनात मोठा कुटुबी बनलो. ब्रह्महत्या करणारा महापापी नरकांत चिंतेसह जशी