या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०८. प्रमाणे अथवा शास्त्रज्ञाच्या शास्त्रापरिचयाप्रमाणे, माझ्या अगवळणी पडून गेली होती. प्राण्याच्या माना कापून, त्याच्या शरीरास सोलून, अवयवाचे तुकडे काढून ते शिजवून आपल्या दुष्ट उदरात कसे भरावे, हे मला चांगलें अवगत झाले होते व पर्वतातून फिरत असताना मी साक्षात् यमराजाचेच काम करीत असे. माठमाठ्या अरण्यास आग लावून देऊन त्यातील हजारो प्राण्यास मी व्यर्थ मृत्युमुखी पाडीत असे. सभासदानों, मी राजाचा एकुलता एक समर्थ पुत्र असूनही काही प्रबल दोषामुळे साठ वर्षे अशा आपत्तीत पडलो होतो १०७. सर्ग १०८--आता या सर्गात अनावृष्टीमुळे त्या देशात दुष्काळ पड़न कमी दुर्दशा झाली तें राजा सागतो. राजा-माझ्या प्रिय सभासदानो, अशा रीतीने कालाशी कलह करिता करिता व सुखाचे किवा दु.खाचे दिवस लोटता लोटतां मी वृद्ध झालो, माझे केस पिकले, मी राजा आहे, या गोष्ठीचे पूर्णपणे विस्म- रण होऊन मी चाडाल आहे, ही माझी भावना त्यावेळी दृढ झाली होती. इतक्यात आजपर्यत भोगलेले दुःख पुरेसे नाही, असे समजूनच जणु काय दैवाने मला असह्य दुर्भिक्ष-दुःखही दाखविले. पावसाळ्यात एकदाही पाऊस न पडल्यामुळे आमच्या प्रातातील सर्व रान सुकून गेले. वृक्षावरील पानेही सुकून व कोमेजून जाऊन, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर, निजीव शरीराप्रमाणे, पटापट खाली पडू लागली. जगलास वणवा लागून अनेक औषधी, वन- स्पती व प्राणी प्रत्यही जळून जात दोन दोन कोसातही पाण्याचा बिद आढळेनासा झाला. कारण भगवान् सूर्याच्या प्रखर किरणानी प्राय सर्व जलाशय शुष्क करून सोडिले होते. सर्व दिवसभर सोसाट्याचा वारा सुटून त्याबरोबर जळलेल्या अरण्यातील राख व धूळ उडून येत असे व त्यामुळे प्राणिमात्राच्या अंगावर त्याची पुटे बसत. आदल्या वर्षाचे अन्न काही दिवस पुरले. पण पुढे त्याचाही अभाव झाला. आझाला भक्ष्याभक्ष्य विचार मुळी नव्हताच. त्यामुळे काही दिवस आमी दुसन्याच्या शरीरावर आपली शरीरें वाचविली. पण पुढे त्याचाही अभाव झाला. अरण्यात दिवसाचे दिवस फिरूनही एकादें श्वापद किंवा पक्षी मिळेनासा झाला. फार काय पण सिंहासारखे प्रबल व मानी प्राणीही दगड खात आहेत व मामाच्या भ्रमाने पर्वतावरील गेरूचे लाल खडे चघळीत आहेत, असे आढळू लागलें. लांकडे