या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०९. १५७ डत असल्यामुळे त्याचे ते रडणे मलाही रडवू लागले. मी त्या अर्भकास 'पुष्कळ समजाविलें. “ बाळा आतां मास नाही आहे, ते मिळाले झणने भगोदर तुला देईन." इत्यादि सागितले. पण ते सर्व व्यर्थ गेलें. “ मला भूक लागली. मला आता मास पाहिजे " असें ह्मणून तो अधिकाधिक आक्रोश करूं लागला. तेव्हां मला मोठा क्रोध आला व दांत-ओठ खाऊन आणि दोन अश्लील शिव्या देऊन, मोठ्याने " भातां माझें मांस शिजवून खा." असे मी त्यास मटले. पण त्याने तेही मान्य केलें व " मला तुझें मांस दे." असें ह्मणूनच वारंवार त्रास देण्यास भारंम केला. त्यामुळे मला माझ्या त्या दरिद्री जिण्याचा कटाळा आला आणि सर्व दुःखातून सुटण्याकरिता मी आसपासची लाकडे गोळा करून ती पेटविली व त्या चितेंत, चाडालकन्या निजली आहे तोच, प्रवेश करावा ह्मणून मोठ्या धैर्याने व वेगाने निघालो. चितेजवळ जाऊन, मी जो त्यांत उडी मारीत आहे तोच सावध होऊन या सिंहासनावरून खाली पडत असून तुही मला धरिले आहे व जयशब्दाचा व वाद्यांचा घोष चालला आहे, असें मी पाहिले. साराश, सभासदानों, या शाबरिकाने मला अशा भयकर मोहात एवढा वेळ पाडले होते. श्रीवसिष्ठ-राघवा, लवण राजा इतके सागत आहे तो तो शाबरिक गुप्त झाला व हा सर्व वृत्तात ऐकून आश्चर्यचकित झालेले सभ्य असे ह्मणाले-देव, हा पोटभरू गारुडी नव्हे. कारण तसे असते तर त्याने धनाच्या आशेने आपणास दुसराच काही चमत्कार करून दाखविला असता. यास्तव ससाराची स्थिति कशी आहे याविषयी बोध करणारी ती कोणी दैवी माया आहे. या आपल्या वृत्तातावरून संसार ह्मणजे मनोविलास आहे, असे स्पष्टपणे कळते. सर्वशक्तिमान् विष्णूचे मन हेच जगत् आहे. त्या परमात्म्याच्या अनेक शक्ति आहेत. त्या विवेकी पुरुषाच्या मनासही मोह पाडू शकतात. नाही तर ज्यास सर्व लोकवृत्तात माहीत आहे, असे आपण राजाधिराज कोठे व सामान्यजनाच्या मनोवृत्तींस योग्य असलेला हा भयकर भ्रम कोठे ? यास्तव हा भिकारी शाबरिक नसून ही मनास मोहित करणारी माया आहे, असे आपण समजा. तो जर सामान्य पोटभरू असता तर त्याने गुप्त न होतां द्रव्याची याचना केली असती.