या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११२. १६३ त्याचा घात केल्यावाचून तुझ्या या व्यथा नाहीशा होणार नाहीत. रम्य वाटणारे विषय अरम्य आहेत इतके तूं जाणलेंस झणजे चित्ताची अगेच तोडलीस असें मी समजेन. हा, तो, मी, व माझे एवढेच मनाचे स्वरूप आहे व त्याची भावना न करणे हीच त्यास कापून काढण्याची तीक्ष्ण सुरी आहे. शस्त्र, अग्नि, वायु इत्यादिकाचे भय वाटते. पण मृद व स्वच्छ अशा या असकल्पामध्ये भय कसले ? कल्याण व अकल्याण आबालवृद्धास समजते व पिता आपल्या पुत्रास कल्याणकारक मार्गा- तच प्रवृत्त करितो. त्याप्रमाणेच या मनासही कल्याणामध्येच प्रत्येकाने प्रवृत्त करावे. अक्षय व फार मोठ्या अशा या चित्तसिहास जे मारितात त्याचा जय-जयकार होतो. ते आपल्याप्रमाणे इतरासही परम पद मिळवन देऊ शकतात. सकल्पामुळे सर्व भयकर आपत्ती येत असतात. पण ज्याचे मन सकन्पशून्य झालेले असते त्यास कल्पात वायू वाहू लागले नरी, सर्व समुद्र एक झाले तरी, व बारा आदित्य ताप देऊ लागले तरी काही क्षति वाटत नाही. यास्तव, रघुनाथा, तू निरिच्छ, शात, सम व विचारी होऊन सकल्पत्यागपूर्वक मनोविजय सपादून अजपदीं लीन हो १११. सर्ग ११२-वासनात्याग हा चित्ताच्या क्षयाचा उपाय आहे व तो चिन्मात्रवा सनेच्या अभ्यासाने आणि त्याविषयींच्या दृढ निश्चयाने साध्य होता, असे येथे सागतात. श्रीवसिष्ठ-रामा, मन ज्या ज्या पदार्थाविषयीं जशा जशा इच्छेने जसा जसा तीव्र वेग धारण करिते तसे तसे आपले इष्ट पहाते. मनाच्या या तीव्र वेगाची जर उपेक्षा केली तर तो अधिकाधिक वाढतो व त्याचा निराध करण्याकरिता प्रयत्न केला तर तो शात होतो. कारण वेग हा त्याचा स्वभाव आहे व त्यामुळे त्यास प्रतिबध न केल्यास तो पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे एकसारखा उत्पन्न होत राहणार, हे उघड आहे. बर्फाचे शीतता व काजळाचें कृष्णता हे जसें रूप आहे त्याप्रमाणे मनाचे चंच- लता हे रूप आहे. श्रीराम-गुरुवर्य, या अति चचल मनाचे चाचल्य बलात्काराने कसे प्रतिबद्ध होईल?