या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११४. १६९ सिद्ध झाली आहे. यास्तव, वायूपासून उत्पन्न झालेल्या व वायूच्या योगानेच बुझणाऱ्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे, संकल्पानेच तिचा नाश होतो. पुरुषाच्या दीर्घ व दृढ प्रयत्नाने आत्मसाक्षात्कार झाला असतां तिची निवृत्ति होते, हे मी मागे सागितलेच आहे. बध व मोक्ष हे मनाचे धर्म आहेत. मी ब्रह्म नव्हे, अशी दृढ भावना झाली असतां मन बद्ध होते व मी आणि हे सर्व ब्रह्म आहे, अशा दृढ भावनेने तें मुक्त होते. संकल्प हाच परम बंध आहे व असंकल्प हीच मुक्तता आहे. मी कृश आहे, मी अति दुःखी आहे, मी बद्ध आहे; मी हस्तपादादियुक्त आहे अशी भावना व तदनुरूप व्यवहार केल्याने मन बद्ध होते व या भावनाच्या विरुद्ध भावना केल्याने ह्मणजे मी दुःखी नाही; माझा देह नव्हे, मग बध कोणास असणार ? असा व्यवहार केल्याने ते मुक्त होते. मास मी नव्हे, हाडे मी नव्हे, तर देहाहून अगदी विलक्षण व भिन्न मी आहे असा ज्याचा आतल्या आत निश्चय असतो तो अविद्यारहित आहे, असे ह्मणतात. आकाशाचे यथार्थ स्वरूप ज्यास थैलावात नसते, असा एकादा अज्ञ भूमीवर उभा राहन आकाशात हत्ती, बोडा, इत्यादि अनेक आकृतींची कल्पना करितो. त्याचप्रमाणे अनात्मज्ञ आत्म्याचे ठायीं अनात्मकल्पना करितो. पण ज्ञानी आत्म्यास अनात्मा व देहादि अनात्म्यास आत्मा कधी समजत नाही. श्रीराम-गुरुराज, या आकाशाच्या दृष्टातावरून मला बरी आठवण झाली. वरील आकाशाकडे पाहिले झणजे आमास सुदर नीलवर्ण दिसतो. जणु काय निळ्या वर्णाची मोठी कढईच पालथी घातली आहे असा भास होतो. पण त्याचे कारण काय ? तेथे नीलवर्ण कोठून आला? नी मेरूच्या रत्नाची छाया आहे की, अवकार आहे ? श्रीवसिष्ठ-रामभद्रा, नीलता हा शून्य आकाशाचा गुण नव्हे व रत्नाची छायाही नव्हे. ब्रह्माड तेजोमय असल्यामुळे व त्याच्या उदरातील आकाशात प्रकाश भरलेला असल्यामुळे अधकाराचाही सभव नाही. तर खोट्या अविद्येप्रमाणे असन्मय अशी ही केवल विपुल शून्यताच आहे. आपल्या नेत्राची दर्शनशक्ति दूरवर जाऊन पुढे कुठित होते. त्यामुळे स्वाभाविकपणेच उद्भवणारे जे तम ( अदर्शन ) तेंच आकाशाचे नैल्य ( नीलता ) होय. आता हे ऐकल्यावर आकाशांत दिसणारी कालिमा