या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरण-सर्ग २८-३१. ४५ अहो सिद्ध, मी आता आपला निश्चय थोडक्यात सागतो. अस्थिर भोगाची मला गरज नाही. क्षणोक्षणी बदलणाऱ्या वस्तूवर विश्वास टेवणे शुद्ध वेडेपण आहे. राजाचा रंक व रंकाचा राजा होतो, नगराचे अरण्य अरण्याचे नगर होते, आज तेजस्वी असतो तो उद्या निस्तेज होतो व जो निस्तेज असतो तो सतेज होतो. जेथे अगाध जल असते तेथे कोरडी ठणठणीत भूमि होते, अपवित्र स्थल पवित्र भूमि होते व पवित्र भमि काही दिवसानी अमगळ स्थळ होते, इत्यादि गोष्टीचा विचार केल्यावर माझे मन ससारात आसक्त होत नाही. माझे ह्मणणे आपणास पटत नसेल तर आपण मला या जगातील एकादी तरी वस्तु काही काळ एकसारखी रहाणारी दाखवा. कालाच्या या खेळास पाहून मी कटाळलो आहे. मी जितका अधिक विचार करू लागतो तितकी माझी विरक्ति दृढ होत जाते मला सुदर उपवन पहावेसे वाटत नाही, स्त्रियाशी पशूप्रमाणे व्यवहार करीत रहावे, असे मनात येत नाही व द्रव्याची आशा मला हर्ष देत नाही. मला एकात पाहिजे. माझें चित्त शात कसे होईल ? ही विवचना मी करीत आहे. मरण व जीवित या दोन्ही अवस्था मला एकसारख्याच वाटतात. मी हल्ली जसा आहे, तसाच आमृत्यु राहणार. मला राज्य नको, भोग नकोत, ऐश्वर्य नको व क्षणिका सुख नको. कारण माझा सर्व अहकार नाहीसा झाला आहे. त्यामुळे हे विपय मला विपासारिखे भयकर वाटतात. इद्रिये हीच दावी आहेत. त्यातून आपणास सोडवून घेण्यातच मोठा पुरुपार्थ आहे. हे मुनीद्र, स्वच्छ बुद्धीने चित्ताची चिकित्सा करण्यास हाच अनुकूल काल आहे. यास्तव, भो भगवन् , आत्मज्ञाप्रमाणे मी शोक, भय व आयास यानी रहित कसा होईन, मला सागा. वासनासमूह, दुःख, तृष्णा, अभिमान इत्यादि- कास निर्माण करणारे अज्ञान मला व्याकुळ करीत आहे. त्याचे परिणाम करवताप्रमाणे मला असह्य वाटतात. मी कोणत्या विज्ञानदीपाने यास नाहीसे करू, ते मला सागा. सज्जनाच्या समागमाने व त्याच्या उपदेशाने ज्याचा नाश होत नाही अशा व्याधिच या सृष्टीत नाहीत, हे मला माहीत आहे. पण कृपानिधे, माझे मन एकसारखे भ्रमण करीत आहे; मला काही सुचत नाही, ससारभयामुळे माझे शरीर कांपत आहे; संतोष पार नाहीसा झाला, अंतःकरणांत अनत विकल्प उठत आहेत. व नेत्रादि इद्रिये