या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीराम-गुरुराज, सर्वच सम ब्रह्म आहे, हे आता मला समजले. पण मला ब्रह्मज्ञान होऊन अज्ञान नष्ट झाले तरी अजून हे जग का भासतें ! त्याचे मूळ अज्ञाम आहे व ते नष्ट झाल्यावर त्याचे कार्य अशा ह्या जगा- चाही बाध होणे युक्त आहे. श्रीवसिष्ठ-तूं. अणतोस ते खरे; पण तुला जर खरोखरच तत्त्वज्ञान झालेले असले तर त्यानंतर भासणारे जगही ब्रह्मच आहे. कारण परम तत्व आपल्या स्वभावभूत परम शातीमध्येच सदा स्थित असते. त्यामुळे सगांचे नावही तेथे नसते. तर मग तो दिसतो कसा या तुझ्या प्रश्नाचें मातां उत्तर सागतो. सागरात जसे जल त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये सर्ग दिसतो. पण समद्रांतील जल व ब्रह्मातील सर्ग यांमध्ये अतर आहे. जल पातळ असल्यामुळे ते सखल प्रदेशाकडे आपोआप वाहू लागते. ह्मणजे त्यांत चलन आहे व ब्रह्मामध्ये ते नाही. सूर्यादि प्रकाशमय गोल जसे आपणच आपणास प्रकाशित करितात त्याप्रमाणे ब्रह्मही स्वय- प्रकाश आहे. पण बाह्य अधकारास हटवून बाह्य प्रकाश पाडणे हा न्यांचा स्वभाव आहे व ब्रह्म, निष्क्रिय असल्यामुळे, प्रकाशन ही क्रिया करीत नाही. आता ब्रह्मज्ञानानतर सर्ग दिसतोच का, ह्मणून ह्मणशील तर त्याचेही कारण सागतो. तुझा तो बोध परिपक्क झालेला नसल्यामुळे तुला सर्गाचे भान होते. पण ज्ञानाच्या परिपाकानतर तो स्थिर ब्रह्मरूप होईल. सर्ग ही परमार्थाचीच सज्ञा आहे, असा निश्चय झाला की, आकाशाचे जसें दुसरें आकाश नसते त्याप्रमाणे त्यात नाना असे काहींच भासत नाही. सारांश चित्ताचा आत्यतिक नाश न होणे हेच तुला पुनः सर्ग दिसण्याचे कारण आहे. चित्ताच्या शांतीचा उदय झाला असतां सत्यरूपाने प्रतीत होणाराही प्रपच असत्य होतो व चित्तवृत्तीचा उदय झाला असतां असत् प्रपचही सत्य भासतो. राघवा, हे सर्व अनंत, अज व पूर्ण ब्रह्म आहे. प्रपच ब्रह्मामध्ये स्थित आहे. कुंभाराने केलेल्या मातीच्या नाममात्र सेनेप्रमाणे हे सर्व नाममात्र जग आहे. आरशांत नऊ योजनें दूर असलेल्या एकाद्या नगराचे प्रतिबिंब पडले असता त्यांत जसा दूरस- मीपभाव रहात नाही त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठायीं दूर-समीपता नाही. तर दूर व समीप हे केवल कल्पना करणान्या जीवाच्या दृष्टीचे भेद आहेत. यास्तव प्रतिबिंबाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे अथवा दोषदृष्टीस भासणान्या दोन