या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० बृहद्योगवासिष्ठसार. होऊन चैतन्याकडून ते प्रकाशित होतात, असे ह्मणावे तर त्यांतही दोष आहे. कारण जगातील सर्व पदार्थ चिन्मात्र व सन्मात्र आहेत असे सम जल्यावर त्याचे भान स्वप्रकाशचैतन्याच्या बलानेच होणे शक्य आहे. चैतन्य व जड याचा सबध मानण्याचे काही कारण नाही. दिवा आपणच आपल्या स्वरूपास व्यक्त करीत असतो. दुसऱ्या दिव्याच्या सबधाची अपेक्षा धरीत नाही. तात्पर्य विषम पदार्थाचा निरतर सबध सभवत नाही व परस्परसबधावाचून परस्पर अनुभव येत नाही. बरे, सर्वच चिन्मात्र आहे, असे समजल्यास सर्वच एकरूप होऊन संबधास अवकाश रहात नाही व त्याची आवश्यकताही नसते. आता अनात्मज्ञास ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीच्या द्वारा अनुभव येतो, असे वाटते. पण चित् व जड याचा अभेद-सबध स्वीकारून त्याचे उपपादन करिता येत नाही, कारण चित् व जड यामध्ये अति वैलक्षण्य असल्यामुळे त्याचे ऐक्य होणे शक्य नाही, हे वर सागितलेच आहे. भेदसबंध मानूनही त्याच्या अनुभवाचे समर्थन करिता येत नाही. कारण चित् व जड याचे एका त्रिपुटीत वास्तव्य कसे होणार ? चिन्मय वस्तूचा चित्शी सबध होतो व त्यामुळे चिन्मय पदार्थाचा अनुभव येतो ह्मणून ह्मणावे तरी जुळत नाही. कारण चिन्मय पदार्थ व चित् याच्यामध्ये सादृश्य असल्यामुळे त्याचे ऐक्य होणे जरी शक्य असले तरी त्यातील एक वेद्य व दुसरे वेतृ ( ह्मणजे ज्ञानाचे विषय व चित् यास जाणणारे, विषयि ) हा भेद रहात नाही. आता तूं ह्मणशील की लाकूड, पाषाण व मृत्तिका याचे जडत्व या दृष्टीने साम्य असतानाही घर बाधताना त्याचा परस्पर सबध होतो व त्यामुळे घर हे एक कार्य होते. किवा जिला व रस ही दोन्ही जल-तत्त्वाची कार्ये असल्यामुळे त्यांचे साम्य असूनही परस्पर योग होऊन रसज्ञान होते; त्याप्रमाणे चित्त्व या रूपाने साम्य असले तरी दृक् व दृश्य याचा योग होण्यास कोणती अडचण आहे. तर त्याचे उत्तर सागतों, लांकूड, माती इत्यादि जड पदार्थ गृहादि पदार्थाच्या रूपाने परिणाम पावतात असा अनुभव येतो. पण चित् कोणत्याही अवस्थेत परिणाम पावत असल्याचे कोठेच अनुभवास येत नाही. जिहा व रस यांच्या संबधाने रसास्वाद समजणे हाही रासनचित्त वृत्तिरूप परिणाम आहे. संबध झणजे ऐक्य. पण जड व चित् याचे