या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्ष द्यावयाचे नाही. ज्याना त्यांसच अधिक महत्त्व द्यावयाचे असेल स्यानी काकदन्तपरीक्षण खुशाल करीत रहावें. आचार्यांनी आपल्या भाष्यात ठराविक दहा-बारा उपनिषदें कचित् वेदमत्र, मनुस्मृति, श्रीगीता विष्णुपुराण व महाभारत यावाचून दुसन्या कोठचींच अवतरणे प्रायः घेतलेली नाहीत. पण तेवढ्यावरून बाकीचे अनेक ग्रंथ त्याच्यापूर्वी नव्हतेच, असे म्हटल्यास अनर्थ होईल. शिवाय आचार्यांच्या पर- परेतील कोणी जरी हा प्रथ लिहिलेला असला तरी तें भूषणावहच आहे. कारण असला प्रथ निर्माण करण्यास समर्थ असे मुनितुल्य यती ज्या परपरेत झाले ती भगवत्पूज्यपादाची परपरा धन्य होय, असे मूळ अथ पाहिल्यावर कोणास वाटणार नाही | श्रीविद्यारण्य, मधुसूदन- सरस्वती इत्यादि प्रसिद्ध प्रथकारानी आपल्या पूज्य प्रथात या प्रथांतील वचनाचा व स्वतः प्रथाचा अनेकदा निर्देश केला आहे.. टीकाराच्या कालाचाही निर्णय होत नाही. पण ते श्रीविद्यारण्याच्या पूर्वी झाले असावेत, असे वाटत नाही. तरी सुद्धा त्याच्याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी ती शेवटच्या भागात देईन असो, परमात्मस्वरूप श्रीशंकराचार्याच्या निःसीम कृपेनेच माझ्या हातून पार पडलेल्या या प्रथाचा उपयोग माझ महाराष्ट्र वाधव यथेच्छ करोत, अशी सदिच्छा व्यक्त करून मी ही प्रस्तावना सपवितो. हैदराबाद सिंध, ज्येष्ठ कृ. ३०. गुरुवार । शके १८३१ सौम्यनामसंवत्सरे. विष्णु वामन बापटशाखी.