या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९८ बृहद्योगवासिष्ठसार. देशतः परमाणुरूप आहे असे मानतात. सारांश अनेकांनी याविषयी अनेक तर्क केले आहेत. ह्या बाह्य जगाप्रमाणेच आध्यात्मिक अहंचीही मिथ्या स्थिति झाली आहे. तो आपल्याला भूतमय समजतो. पण तो सुद्धा भासत असूनही निशाचराप्रमाणे परमार्थतः नाही. श्रीराम-भगवन् असे जर आहे तर महाकल्पाचा क्षय झाला असता हे दृश्य, बीजामध्ये जसा अंकुर त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म कारणांत रहाते व सृष्टिसमयीं त्यातूनच पुनः उद्भवते असे जे महात्म्यानी सागितले आहे त्याची काय वाट ? त्या महात्म्याना अज्ञ ह्मणावयाचे की ज्ञानी ? श्रीवसिष्ठः-हे दृश्य प्रलयसमयीं, बीजामध्ये जसा अंकुर त्याप्रमाणे, आपल्या कारणात लीन झालेले असते असे ह्मणणारे जे कपिलादि ( साख्यादि शास्त्रांचे ) आचार्य त्यांच्यामध्ये फार नसले तरी थोडेसें बालिशपण असतेच. कारण आत्मा असंग आहे, असे जरी ते बरोबर समजत असले तरी त्याचवेळी जग सत्य आहे हा आपला विश्वास ढळू देत नाहीत. यास्तव हे अवास्तव कसे आणि तें वस्तुभूत आहे असें समजणे हा श्रोता व वक्ता या दोघांनाही मोह पाडणारा विपरीत बोध कसा ? तेंच मी आता तुला अनेक युक्तींच्या, द्वारा सागतो. 'बीजांतील अंकुराप्रमाणे प्रलयसमयी जग कारणांत असते; या वाक्यातील बीजांकुर- दृष्टातच मुळी बरोबर नाही. कारण दृष्टांतातील बीज दृश्य आहे. स्थूल आहे. तेव्हां त्याच्यापासून, भूमि, जल इत्यादि अनुकूल सहकारी सामग्री मिळाली, ह्मणजे दृश्य अंकुर उद्भवणे शक्य आहे. पण दार्शतिकाची अवस्था याहून अगदी निराळी आहे. चिदकरस आत्मा इंद्रिये व मन यांचा विषय होत नाही. तो अणहून अणु आहे. शिवाय तो कूटस्थ हणजे निर्विकार आहे. तेव्हां तो जगाचे बीज कसा होणार आणि बीजां- तील अंकुराप्रमाणे जग तरी त्या असंगाचे ठायीं कसें रहाणार ? आका- शाच्या अंगाहूनही अति स्वच्छ व अति शून्य अशा त्या परम पदाच्या ठायीं जग व जगातील मेरु, समुद्र, गगन इत्यादि पदार्थ कसे असणार ! आकाशाहूनही सूक्ष्म व नामशून्य अशा परमात्म्याच्या ठिकाणी बीजता रहाणे अशक्य आहे. ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने भात्मा जगद्बीज होऊ शकत- नाही, असे तुला यावरून समजलेच असेल. पण आतां आज्ञांच्या दृष्टीनेही तो जगत्कारण कसा नाही ते सांगतो.