या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १. ४९९ परमात्मा वस्तुतः जरी सत् या एकाच रूपाने सदा सिद्ध आहे, तरी अज्ञ पुरुषांच्या दृष्टीने तो अगदी सूक्ष्म असल्यामुळे असत्च आहे. तेव्हा त्याच्या समजुतीप्रमाणे तरी तो बीज कसा होणार ? आणि बीजा- चाच जर मुळी अभाव झाला तर त्याच्यापासून जगदंकुर कसा निपजणार ? यास्तव त्या वस्तुभूत ( सत्य ) आत्म्याच्या ठायीं दुसरी कोणतीही वस्तु खरोखर राहू शकत नाही. बरे इतकेही असून रहाते, ह्मणून ह्मणावे तर तिचा अनुभव का येत नाही ? कारण आत्मा स्वतः अनुभवरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा अनुभव, निदान त्याला तरी, झोपेतील आनंदाप्रमाणे यावयास पाहिजे. साराश आत्म्यापासून काहीं एक झाले नाही. शून्यरूप घटाकाशापासून पर्वत होणे कधी तरी शक्य आहे का? शिवाय चिदेकरससत्ता व जड-अनेक-रससत्ता याचा परस्पर विरोध आहे. छाया व ऊन याच्याप्रमाणे त्याचे हाडवैर आहे. त्यामुळे आत्म्या- च्याठायी जगाची सत्ता सभवत नाही. कारण सूर्याचे ठायी तम कसें असणार ? अग्नीमध्ये हिम कसें रहाणार ! अणूमध्ये मेरु कसा मावणार ! आकाररहित वस्तुच्याठायीं काही एक असणे शक्य नाहीं आत्मरूप व अनात्मरूप याचे ऐक्य होणे शक्य नाही. साकार वटबीजादिकान्या ठायीं साकार अकुर असणे युक्तिसिद्ध आहे, पण निराकार ब्रह्माचे ठायीं हे महा- कार जग असणे युक्त नाही. बुद्धयादि सर्व इद्रिय-शक्तींनी दिसणारे जग प्रलयकाली दिमत नाहीसे होते. यास्तव लौकिकदृष्टया ते त्यावेळी आहे असें ह्मणता येणे शक्य नाही. बरें शास्त्रीयदृष्टया ते प्रलयसमयी असते ह्मणून ह्मणावे तर 'पूर्वी सत्च होते' हे श्रुतिरूप परमशास्त्र आत्मा व जग याच्या भिन्न सत्ताचा निर्देशच करीत नाही. तर 'एक सत् होतें' एवढेच सागत आहे यास्तव रामा, तूं मूढानी कल्पिलेल्या या कार्य-कारणभावाचा, उपादान-उपादेयभावाचा व असल्याच दसऱ्याही अनेक कल्पनाचा त्याग करून झणजे त्या मिथ्या आहेत, पारमार्थिक नव्हेत, असें निश्चयाने समजन सर्व कल्पनातीत पण सर्वांचे अधिष्ठान असें आदि-अत-मध्यरहित व सत्य ब्रह्मच भ्रमाने जगदृप भासत आहे, असें जाण १.