या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०० बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग २-तर्कानी जगत्स्थितीचे निरसन. पूर्ण आनंदरूपता. श्रीवसिष्ठ-रामा, समस्त कलनाशून्य व निर्मल महा चैतन्याकाशात प्रलयसमयी जगाची पृथक्सत्ता मानल्यास कोणते दोष येतात ते सागतो. जगादिकांचा अंकुर त्यांतूनच निघतो ह्मणून जर तूं ह्मणत असशील तर कोणत्या सहकारि कारणांपासून तो होतो, तें साग पाहू. कारण कोण- त्याही कार्याला कांप्रमाणेच सहकारि कारणाचीही अत्यत आवश्यकता भसते. त्याच्या अभावी, वंध्येच्या कन्येप्रमाणे, अंकुराची उत्पत्ति होणेही शक्य नाही. आतां रज्जुसर्याप्रमाणे सहकारी कारणावाचूनच तें अभिव्यक्त झाले आहे, ह्मणून जर ह्मणावे तर मूल कारणच भ्रात जगाच्या स्वभाव- स्थितीस प्राप्त झाले आहे, असें होईल. पण वस्तुतः जगाची उत्पत्ति होत नसल्यामुळे प्रलयसमयी जग विद्यमान असते अशी कल्पना करणे व्यर्थ आहे. सर्गाच्या आरंभी ब्रह्मच सर्गरूपाने भासते व त्याचवेळी ते आपल्या शुद्धरूपानेंही व्यक्त होत असते. सृष्टिसमयींही ते तसेच आकारशून्य असते. तेव्हा जन्य व जनक हा क्रम कसा व कोठे असणार? श्रीरामः-पण गुरुवर्य, प्रलयकाळी सर्व जगाचेच अस्तित्व मान- ल्यावर-सहकारी कारणाचा अभाव असतो व त्याच्या अभावी अकुर कसा उद्भवणार-ही शंका रहात नाही. कारण त्यातील पृथिव्यादि पदार्थ पर. स्पराच्या उत्पत्तीस सहाय करतील, श्रीवासष्ठ-अरे वेड्या, पृथिवीप्रभृति पदार्थ जरी तेथे असले तरी ते स्वतः उत्पन्न झालेले नसतानाच दुसऱ्याच्या उत्पत्तीला सहाय कसे करणार ? तस्मात् प्रलयसमयीं प्रकृतियुक्त ब्रह्माचे ठायीं जगाची सत्ता असते, हे साख्यादि-आचार्याचे ह्मणणे युक्तिशून्य आहे. रामा, हे जग पूर्वी कधी नव्हते, आता नाही, व पुढेही नसेल. तर चेतनाकाशच त्रिकाळी भ्रमाने जगद्रूप दिसते. जगाचा याप्रमाणे अत्यताभाव असल्यामुळेच 'हे सर्व ब्रह्म आहे' 'सर्व आत्मा माहे पुरुषच सर्व आहे ' इत्यादि श्रुतिवाक्ये सार्थ होतात; नाहीपेक्षा ती कधीही समजस झाली नसती. जगातील घट, पट, इत्यादि वस्तूचा दगड मारणे, कोलीत लावणे इत्यादि उपायाच्या योगानेही नाश होतो हे खरे; पण तो त्याचा खरा बाध नव्हे. तर त्याच्या आकाराचा मुळे ते केवळ त्याचे अदर्शन होय. पण आझाला अत्यताभाव गाचा ज्ञानतः बाध होणे हा अर्थ सुचवावयाचा आहे.