या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २. ५०१ चित्तावील जगद्वासनेचाही क्षय होणे हा खरा बाध आहे व तो वर सांगित- लेल्या प्रकारच्या ज्ञानावाचून होणे शक्य नाही. कामादि वासना शांत झाल्या झणजे आमचा हा सिद्धान्त न सागताच समजतो. पण त्याची शाति होणे फार कठिण आहे. या मायिक वस्तूही चित्ताला अतिशय परतंत्र व व्याकुळ करून सोडतात. त्या प्रयत्नवान् पुरुषाच्या मनालाही आपल्या- मध्ये आसक्त करतात. त्यामुळे वासनाक्षय ह्मणजे एक काल्पनिक कथा होऊन बसली आहे आणि त्या कारणानेच आमचे हे त्रिकाल सत्य सांग- गेही सर्वाना पटत नाही. पण बाबारे, अनुभव हे सर्वोत्तम प्रमाण आहे. आह्माला जगाच्या अत्यताभावाचा प्रत्यय पूर्णपणे आलेला आहे. यास्तव कोणी काही जरी झटले, तरी आमाला जे साक्षात् कळले आहे तेंच आमी सागणार जगद्रप दृश्याचा अन्यत अभाव आहे, हा आमचा परम सिद्धान्त असून तसे निश्चयपूर्वक जाणणे यावाचून अनर्थनिवृत्तीस दुमरा उपायच नाही. जगाच्या तत्त्वाचा साक्षात्कार झाल्याकारणाने चिदाकाशाचा पूर्ण अनु- भव आला ह्मणजे मग हा मी, ते जग, तो तृ इत्यादि सब चित्रकथा होतात. म्हणजे ज्या भितीवर अनेक चित्रे काढली आहेत अशा भिंती- च्या स्वरूपाकडे लक्ष दिले असता तिच्यावरील चित्राकडे पाहून हा घोडा, हा हत्ती, हे मनुष्य, ही नदी, हा राम, हा रावण इत्यादि प्रत्यय जसे मिध्या व शन्दमात्र आहेत असे ठरते, त्याप्रमाणे तत्त्वसाक्षात्कारानतर मी, तु, इत्यादि भावनाही मिथ्या आहेत, असे प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागते. पर्वत, पृथ्वी इत्यादि, क्षण, सवत्सर, युग, कल्प इत्यादि, मरण, जन्म, कल्पान्त, महाकल्पान्त इत्यादि सर्व वस्तुन नमून ते महाचित्परमाकाशात आपोआप स्फुरण पावते चित् जमच्या तसेच अमते. पण कवड- शातील तरगणाऱ्या परमाणप्रमाणे त्यात मनरूपी अनत परमाणू फिरत रहातात. ज्याप्रमाणे एकाद्या लहानशा फळाला पिळून त्यातून रम किंवा चीक काढावा, त्याप्रमाणे मनाच्या योगानें मर्यादित झालेल्या व वासनांनी पिळलेल्या चैतन्यातून जग निघते. नेत्रगत दोपामुळे स्फटिकमण्यामध्येही जशा रेखा दिसतात, त्याप्रमाणे वामनाच्या योगाने मलिन झालेल्या चित्तात नदी-पर्वत-वृक्षादि दिसतात. पण स्फटिकमण्यातील त्या भ्रामक रेखा जशा कधी खरोखर उत्पन्न होत नाहीत व त्याचा नाशही होत