या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १०. पडला. त्याचे चचल मन मात्र स्वर्गगमनादि अनेक कल्पित दशांमध्ये, वनांत भटकणाऱ्या हरणाप्रमाणे, फिरत राहिले. वेगाने फिरणाऱ्या चक्रा- वर घातल्याप्रमाणे भोगाच्या कल्पनानी भ्रात झालेले व जन्म-मरणपरंपरा- कल्पनानी उद्भात झालेले त्याचे मन फार दिवसानी समगानदीच्या तटावर स्थिर झाले. त्याला तेथें विश्राति मिळाली. अनत वृत्तातानी धन, मनोमात्र (कल्पित) असल्यामुळे कोमल ( नाजुक ) व सत्यताभ्रातीमुळे प्राक्तन देहाचे विस्मरण पडते झणन अति दृढ अशा ससारदशेचा शुक्राने, आपल्या देहाविषयी निरपेक्ष असतानाही, अनुभव घेतला. मदर पर्वतावरील त्या बुद्धिमानाची ती तनु सूर्याच्या तापाने अगदी शुष्क होऊन चर्मशेष होऊन राहिली होती (म्ह. आतून हाडाचा सागाडा व वरून मास-रक्तहीन चामडे अवशिष्ट राहिले होते) त्यामुळे वायु तिच्या रध्रांत शिरून सुदर ध्वनि करीत बाहेर पडूं लागला. तेव्हा तो- शरीरावरील अभिमान सोडला असता दुःखाचा क्षय व परम आनंदाचा लाभ होतो आणि पाचभौतिक शरीराची ही पहा अशी गति होते;- असेंच जणुं काय सर्वास मधुर शब्दाने सागत आहे, असे वाटले. ससार- भूमीतील खड्डयात पडलेल्या दीन मनाला जणुं काय ते शुक्रशरीर दांत काढून हंसतच होते. ती शुक्राची तनु आपल्या मुखरूपी अरण्यातील नासा-नेत्रादि छिद्ररूपी जुन्या कूपाच्या शोभेने विवेक्याच्या दृष्टीला जगाचें शून्यत्वच साक्षात् भासवीत होती. प्रथम सूर्याच्या प्रखर तेजाने सतप्त होऊन मागून तिच्यावरून पावसाच्या धारा वाहू लागल्या असता पूर्वज- न्मींच्या बाधवाचे स्मरण झाल्यामुळेच जणु काय ती ढळढळ रडत आहे, असे वाटले. असो; तात्पर्य शुक्राची तनु अस्थिचमेमय होऊन राहिली. हिंस्र पशु-पक्ष्यानी तिचाही केव्हांच फना उडविला असता पण तो पुण्याश्रम रागद्वेषशून्य असल्यामुळे व भृगूच्या महा तपःप्रभावामुळे मासभक्षक प्राण्यांनी तिला स्पर्शही केला नाही. राघवा, याप्रमाणे शुक्राचे चित्त समंगानदीवरील यमनियमानी कृश केलेल्या शरीरात तप करीत राहिले व प्राक्तन शरीर भगूच्या आश्रमांतील दगडात व धुळीत लोळत पडले ९. सर्ग १०-पुत्राचे मृतशरीर पाहून भृगु कालावर रागावला व कालाने त्याल मात्मविवेचा बोध केला. श्रीवसिष्ठ-दाशरथे, पुढे पुष्कळ दिव्य वर्षांनी भृगु परमबोधमय ३३