या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १०. तरी मोक्षापर्यंत रहणारे आहे. तेंच तुला क्रोधादिकाच्या योगाने पीडा देत आहे. बा साधो, चतुर सारथि जसा रथाला नेतो त्याप्रमाणे हे मन देहावर · अह' असा अभिमान ठेवून त्याच्याकडून नानाप्रकारचे व्यवहार करविते. पण ते आतून त्याला कशी प्रेरणा करतें हे काही कोणाला कळत नाही व पुष्कळ विचारानतर कळले तरी सागता येत नाही. एकादा ओल्या मातीशी खेळणारा बालक जसा क्षणात एक चित्र बनवितो व लागलेच ते मोडून दुसरे करतो त्याप्रमाणे हे मन दुसऱ्या देहाची कल्पना करून हा प्राप्त देह नाहीसा करते. चित्तच पुरुष असून त्याने जें केलें त्यालाच केले असें ह्मणतात. असत् वस्तूच्या संकल्पामुळे ते बद्ध होते व संकल्पाचा अस्त झाला असता ते मुक्त होते. हा देह, हे अग, हे मस्तक इत्यादि भावना मनच करितें तेच पूर्व पूर्व जीवापासून उत्तर- उत्तर जीवसज्ञक होते. 'मी' असा अभिमान धरल्यामुळे ते अभिमन्तृ (अभिमान करणारे ) होते. ते स्वत च नानारूप बनते. देहवासनेच्या योगाने आपली दुसरी अनेक असत् पार्थिव शरीरे पहाते. पण त्याचे हे देहादिकाचे कल्पकत्व आत्मसाक्षात्कार होईतोंच असते. त्याला सत्याचे दर्शन झाले ह्मणजे असन्मयी शरीरभावना सोडून ते परम निवृतीस ( परमानदास ) प्राप्त होते. तू समाधीत स्थित असताना, हे मृगो, तुझ्या पुत्राचे मन आपल्या मनोरथ-मार्गाने अति दूर गेले घरट्यातून उडालेल्या पक्ष्याप्रमाणे ते या शुक्रसबधी शरीरास येथेच सोडून देव- लोकास गेले. तेथे ते कल्पवृक्षाच्या कुजात, पारिजात लताच्या जाळ्या. मध्ये, नंदनवनातील ताटव्यात व लोकपालाच्या नगरात आठ चतुर्युगें विश्वाची-अप्सरेसह रममाण होत राहिले. नंतर तीव्रसवेगाने केलेल्या त्याच्याच सकल्पामुळे पुण्यक्षय झाला असता त्याचे तेथील शरीरा- वयव शिथिल झाले. त्याच्यावरील पुष्पे कोमेजलीं व कालयोगाने पिकलेल्या फळाप्रमाणे त्या अप्सरेसह तें (शरीर ) पतित झाले. तेव्हा मनाने देवशरी- राचा त्याग केला. ते आकाशरूप झाले व पुनः मयुलोकी जन्मास आले. मुने, याप्रमाणे स्वसकल्पानेच संसारचक्रात पडलेला तुझा तो मनोमय पुत्र दशार्णदेशात ब्राह्मण झाला; कोसलात राजा झाला, एका मोठया अरण्यांत व्याध झाला; गगेच्या काठी हस बनला, सूर्यवंशात पौड़ाधिपति शाला; सौरदेशांत मंत्रोपदेशक बनला; व तेथें मंत्रोपासना केल्यामुळेच तो