या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

On instianm/rawtipur ५२० बृहद्योगवासिष्ठसार. भेदवासनावेलीला हे द्वैतरूप फळ आले आहे.) भेदवासनेमुळेच मन जगांतील पदार्थसमूहास पहाते. त्याला हे अनेक भिन्न भिन्न पदार्थ पढ़ें दिसतात. मी कृश आहे, अति दुःखी आहे, मूढ आहे, या व अशाच प्रकारच्या दुसऱ्याही भावना करीत ते ससारित्वास प्राप्त होते. मनन हे कृत्रिम रूप आहे; ते माझें स्वाभाविक स्वरूप नव्हे असे समजून विचार व दीर्घ प्रयत्न यांच्या योगाने त्याचा त्याग केला असता स्वभावतःच शात होणारे चित्त सनातन ब्रह्म होतें. ज्याप्रमाणे अगाध जलाने परिपूर्ण अस. लेल्या विस्तीर्ण सागरामध्ये लहान, मोठ्या, वृद्धि पावणाऱ्या, क्षीण होणान्या, गर्जना करणाऱ्या, मौन धारण करणाऱ्या, आखूड, लाब इत्यादि नाना- प्रकारच्या तरगाची उत्पत्ति, स्थिति व लय एकसारग्वा होत असतो, पुनः पुनः नाहीसे होणारेच तरग पुनः पुनः उठतात, पण ते तिन्ही अवस्थेत जलरूप असतात व त्यामुळेच त्याना सत् ह्मणावे की असत् ह्मणावे हे कळत नाही त्याप्रमाणे या अति शुद्ध, शात, निरुपद्रव, व अनाद्यनत ब्रह्मामध्ये अनेक विचित्र आचारानी चचल झालेल्या व वस्तुतः पृथक् नसतानाही पृथक् असल्याप्रमाणे भासणा-या नाना शक्ति अनेकशक्ति- संपन्न मनाच्या योगाने उद्भवतात. या सृष्टीमव्ये अनुभवास येणा-या अनेक पदार्थाच्या रूपाने ब्रह्माचेच परिवर्तन होत असते. जगत् या नावाची कल्पना त्रिकाली ब्रह्माहून भिन्न नाही. ब्रह्म व जग याच्यामध्ये यत्किचि- त्ही भेद नाही. हे सर्व ब्रह्म आहे, जगत् केवल ब्रह्मच आहे; अशी तूं मोठ्या प्रयत्नाने भावना कर व इतर सर्व चिता सोड, सर्वत्र सदा एकरूप असणारी सत्ता सर्व पदार्थात आहे व तिच्या आधारानेच दुसरी अनेक रूपें भासत असतात. चिदाभास चित्तात आला ह्मणजे तो आपल्याला अहं असें ह्मणून मी आत्मा आहे असें जाणतो व त्याहून भिन्न असलेले सर्व अनात्मरूप आहे अशी कल्पना करतो. पण त्या दोन्ही प्रकारच्या कल्पनागध्ये ब्रह्मसत्ता असतेच. त्यामुळे चित्ताच्या भेद- वासनेच्या योगानें ज़ड, अजड, आत्मरूप, अनात्मरूप इत्यादि परस्पर विरुद्ध स्वभावाचे पदार्थ जरी प्रत्ययास आले तरी आधष्ठानरूप व सर्वगत सत्ता जशीच्या तशीच अबाधित असते, यास्तव हे निष्पाप मुने, पूर्ण सागराप्रमाणे हे ब्रह्मच नाना विवर्तरूपाने अनुभवाप येते. प्रयाप्रमाणे तरंग जलाहून विचित्र नसतात त्याप्रमाणे त्या विश्वेश्वराहून कोणतीही