या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ११. ५२४ कल्पना पृथक् नसते. एका बीजामध्ये जशी-अंकुर, शाखा, पाने, कळ्या, फुले, फळे-इत्यादिरूप अनेकता असते तशी त्या परम देवामध्ये सर्व- शक्तिता रहाते. सूर्याच्या तीक्ष्ण प्रकाशामध्ये जसे अनेक वर्ण भासतात त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये ही सदसन्मयी विचित्र शक्तिता असते. एकरूप मेघापासून जसें अनेकरूप इद्रधनुष्य उत्पन्न होते त्याप्रमाणे विचित्ररूप नसलेल्या ह्मणजेच एकरूप असलेल्या शिवापासून अनेकरूप जगत्स्थिति उत्पन्न होते. ज्याप्रमाणे कोळ्याच्या अगातून ततृ निघतात अथवा निजलेल्या पुरुषाच्या चित्तापासून स्वप्नातील अनेक पदार्थ प्रकट होतात त्याप्रमाण चित्ताच्या जाड्य भावनेमुळे अजडापासून ह्मणजे चित्-तत्वापासून जडाचा उद्भव होतो. एका जातीचा कोळी आपल्यालाच बाधून घेण्याकरिता जसा ततचे जाळे पसरतो त्याप्रमाणे चित्तगत चिदाभास आपल्याच बंधाकरितां स्वेच्छेनें वासनावैचित्र्य उत्पन्न करितो व द्वैतभावनेने आपल्या स्वरूपाला विसरतो. पण मनोनिग्रहाच्या द्वारा वासनावैचित्र्य नाहीसे केले असता पुरुष आपल्या पूर्ण स्वरूपाचा साक्षात् अनुभव घेऊन मुक्त होतो. स्वतःविषयी जशी भावना करावी तसाच तो स्वतः होतो. दीर्घकाल भावना केल्यामुळे दृढ झालेली वासना पुरुषाला तत्काल आपल्यासारखी बनविते. जो ऋतु लागेल त्याप्रमाणे वृक्ष तत्काल बनतो, हे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जी शक्ति उद्भवेल त्याप्रमाणे अज आत्मा तत्क्षणी होतो. तत्त्वदृष्टया बध व मोक्ष यांची कल्पनाच सभवत नाही. पण बध व मोक्ष याचा अभाव असतानाच आत्मा भ्रातीने बध-मोक्षमय आहे असे वाटते. नित्याला अनित्याने ग्रासून टाकले आहे. अहाहा! हे जग मायामय आहे! चित्ताचा उद्भव हा मुख्य बंध आहे व बाकीचे बंध त्याच्यामुळे होणारे आहेत. समुद्रावरील तरं- गाप्रमाणे अथवा चद्रापासून निघणान्या किरणाप्रमाणे कर्मेंद्रिय-ज्ञानेंद्रिय- तामस-सात्त्विक इत्यादि भेद त्याच्यापासूनच उत्पन्न होऊन त्याच्या ठायींच रहाणारे आहेत. ते भेद वस्तुतः पृथक् नसतानाही पृथक् असल्या- सारखे भासतात. या स्पंदमय, विस्तीर्ण, चिजलमय, परमात्मसागरात, अनेक मनःशक्ती उद्भवतात. त्यातील काही स्थिर व काहीं अस्थिर अस- तात. काही ब्रह्म-विष्णु-रुद्रात्मक, काही पुरुषरूप, काही शक्ती देवरूप व काही कृमि, कीट, पतग, सर्प, गाय, मशक, अजगर इत्यादि-रूप उत्पन्न होतात. त्यांतील कित्येक शक्तींचे दीर्घ जीवित असते; कित्येकींचें