या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ बृहद्योगवासिष्ठसार. अल्प असते. कित्येकींची देहकल्पना मोठी असते; कित्येकींची अति तुच्छ असते. या संसार-स्वप्नामध्ये काही शक्ती चिरस्थायी आहेत, असा भास होतो, व त्यामुळे दृढविकल्पाने मोहित झालेले कित्येक जग सुस्थिर आहे अशी संभावना करतात. कित्येक अल्प-अल्प भावना करणारे दैन्यदोषाच्या वश होतात व मी कृश आहे, अति दुःखी आहे, मूढ आहे असे समजतात. साराश, बा भृगो, ब्रह्मसागरापासून उद्भवलेल्या चंचल व मनननामक चिच्छक्तीतील कित्येक स्थावरतेस, कित्येक देवत्वास, कित्येक सदेहतेस व कित्येक सागररूपत्वास प्राप्त होऊन त्यातील काही या जगात शेकडों कल्पपर्यत रहातात आणि चद्राप्रमाणे ज्ञानामताने परिपूर्ण व त्यामुळेच शुद्ध असलेल्या कित्येक परम पदास जातात ११. सर्ग १२-तरंग व सागर याच्या दृष्टांतावरून आत्म्याच्या ठिकाणी येत असलेल्या विकारत्वाचे निवारण, माहापासून उद्भवलेले जगद्वैचित्र्य भ्रमरूप आहे काल-बा मुने, देव, दानव, मानव इत्यादिकाच्या आकाराच्या ज्या ह्या चित्कल्पना ब्रह्मसागरापासून झाल्या आहेत त्या ब्रह्माहून भिन्न नाहीत. हे ब्राह्मणा, मिथ्या भावनेने कलंकित झालेले मूढ जीव आम्ही ब्रह्म नव्हे असें आतल्या आत निश्चयपूर्वक जाणून अधोगतीस जातात. ब्रह्मसागरा. तच असताना ते आपण ब्रह्माहून भिन्न आहो अशी भावना करून भयंकर संसार-भूमीत लोळत पडतात. देहच मी आहे अशी पुनः पुनः भावना करणे हेच पुण्यपापप्रवृत्तीचे कारण आहे तथापि देहात्मभावनाही ब्रह्माहून भिन्न नाही, असें तू जाण. कर्मबीजापासून उद्भवणा-या फल- वैचित्र्याचेही संकल्पच कारण आहे. सकल्पापासून उद्भवणान्या या विस्तीर्ण शरीरपंक्तीतील काही शरीरें उभी असतात, काही वल्गना करि- तात, काही रडतात व काही हसतात. वायूचा, स्पदाच्या योगाने, जसा विचित्र व्यवहार चालतो त्याप्रमाणे आब्रह्मस्तंबपर्यत असलेल्या शरीरातील काही उत्पन्न होतात, काही लीन होतात, काही म्लान होतात व काही हंसतात. आत्मसागरापासून उठणाऱ्या या लहरींतील हरि-हरादिक काही लहरी अतिशय स्वच्छ असतात, कारण त्यांच्या ठायीं ज्ञान व ऐश्वये याचा परमावधि झालेली असते. काहीं नर, अमर इत्यादि लहरी अल्प मोहयुक्त असतात. कारण त्याच्यामध्ये ज्ञानाधिकाराची योग्यता असते. वृक्ष, वली, गवत इत्यादि काही अत्यंत मृद असतात. पशु-पक्ष्यादि दुसन्या