या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १७. ५३३ योगानें दूषित झालेली नव्हती. हा त्याचा जन्म अति शुद्ध होता. यास्तव तो सत्यसंकल्प झाला होता. मनोरथ सफळ होण्याची दोन कारणे आहेत. एक सत्य संकल्प करण्यास योग्य अशी चित्तशुद्धि व दुसरें मरणसमयी उत्तर भोग देणान्या तसल्याच कर्माचा उद्भव होणे. यातील चित्त-शुद्धिरूपी प्रथम कारण शुक्राच्या ठायी होते. सर्व इन्छाची शाति होऊन अति शुद्ध झालेल्या चित्ताची जी स्थिति तेच सत्य होय, तिलाच त्रिमल चित् असे ह्मणतात. सत्य आत्म्याची भावना करणारे निर्मल मन जशी जशी भावना करते तसे तसे ते तत्काळ होते. भगु- पुत्राचा हा विभ्रम जसा आपोआप उठला व तो मत्य संकल्यामुळे घरा झाला त्याप्रमाणे इतर जीवाचें चित्त शुद्ध जरी नसले व त्यामुळे त्याचे संकल्प सत्य जरी नसले तरी प्राक्तन कर्मवासनेमुळे (ह्मणजे वर सागितलेल्या कारणातील दुसन्या कारणाने) त्याचेही मनोरथ सफळ होतात. बीजातील अकुरादिकाप्रमाणे सर्व भूतसघाचे भ्रातिकृत द्वैतविभाग योग्य काळी आपोआप उद्भवतात. हे दृश्य जगत् असेच प्रतिजीवाच्या सकल्पामुळे मिथ्या उत्पन्न झाले आहे व ते तसेच अस्त पावेल. पण परमार्थदृष्टया हे दृश्य उत्पन्न होत नाही व अस्तही पावत नाही. तर हे भ्रातिमात्र आहे. शुक्राप्रमाणेच आह्मीही सर्व असेच झालो आहो. आमचा आकारही स्वसकल्परूप आहे. आह्मी मिश्या वस्तूला सत्य ह्मणतों. ही सर्गसंतति हिरण्यगर्भामध्येही अशीच अंधपरंपरेने स्थित आहे. सर्व जीव-जगदाकाराने ब्रह्मच उदय पावले आहे. आमचा प्राथमिक संकल्पच जगद्प झाला आहे ही सत्य गोष्ट तत्त्वज्ञानाने कळते. अनादि अज्ञानात असलेले चित्तच जगत् आहे, असे पहाणारा आपोआप नष्ट होतो. जोवर जगाचा प्रतिभास होत असतो तोवरच त्याची सत्ता असते. ह्मणन त्याच्या वास्तविक अधिष्ठानाचे दर्शन झाले असता ते राहू शकत नाही. जगजाल हैं दीर्घ स्वप्न व चित्तरूपी मत्त हत्तीचे बंधनस्थान आहे. चित्सत्ताच जग- त्सत्ता असून जगत्सत्ताच चित्त आहे. यास्तव चित्ताचा नाश झाला की, जगाचाही नाश होतो. सत्य आत्म्याचा विचार केला असता चित्ताचा नाश होतो. धुणे, घांसणे इत्यादि उपायांच्या योगाने मलिन मण्याला शुद्ध केलें असतां तो जसा आपलें प्रकाशादि-कार्य करूं लागतो त्याप्रमाणे ऐकाय्याचा दृढ अभ्यास केला असता चित्ताची शुद्धि होते व त्यामुळे