या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १९. ५४१ असलेलें रूप आपल्यामध्ये पहाते. अनुभवकाळी जाग्रत् व स्वप्न यांमध्ये कांहीं अतर नसते. पण एकदां अनुभविलेला पदार्थ पुनः पुनः अनुभवास आल्यामुळे व तोच हा अशी प्रत्यभिज्ञा (ओळख ) होत असल्यामुळे तो स्थिर आहे अशी कल्पना होते. आता सुषुप्ति व तुर्य यांचा क्रम सांगतो. वाचिक व कायिक विक्षेप शात झाला ह्मणजे स्वप्नाचा उदय होतो व त्याच्यासह मानस विक्षेपही शांत झाला की, सुपप्तीस आरंभ होतो. हा तिन्ही प्रकारचा शरीरक्षोभ क्षीण झाला असता जीवधातु शात व स्वस्थ रहातो. समतेस प्राप्त झालेले वायू हृदयाकाशात क्षोभ उत्पन्न करीत नाहीत, असे झाले झणजे तो जीवधातु, वायुरहित गृहात ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे, केवल निर्विक्षेप-अवस्थेस प्रकाशित करतो. त्यामुळे शरीरगत नाड्यामध्ये सवित् उत्पन्न होत नाही. सवितच्या अभावी हृदय. क्षोभ होत नाही. चित्तवृत्ति नेत्रादि रांकडे येत नाही व ती बाहेरही पडत नाही. उपनिषदात ' त्यावेळी जीव सत्संपन्न होतो. सद्रूप ब्रह्माशी मिळून जातो' असे म्हटले आहे, हे खरे. पण तो 'मी जीव आहे' या संस्कारासहितच ब्रह्माशी मिळत असतो. ह्मणन सत्सपन्न होत असूनही तो मुक्त होत नाही. किवा त्याला आत्म्याचा साक्षात्कार होत नाही. तर तिळातील तेलाप्रमाणे हिमातील शीतसवित् प्रमणे अथवा घृतातील स्नेहसंवित्-प्रमाणे जीव आतल्या आत स्फुरत असतो. वेदात-सुषुप्तिकाळी जीव हृदयाच्या सर्व शोकापासून मुक्त होतो-असे झटले आहे व त्यामुळे तो ब्रह्ममय होऊन जातो असे वाटते. पण त्याची भेदवासना लीन झालेली नसल्यामुळे जीवाचे तें आत्यंतिक अथवा निरवशेष ब्रह्मैक्य नव्हे. तर मनोरूपी उपाधि लीन झाल्यामुळे व जीवाकार चिति स्वच्छ असल्यामुळे तिचे स्वाभाविकपणे होणारे ब्रह्मैक्य होय. प्राणवातकृत विक्षेपही सुषुप्तीत होत नाही. कारण त्यावेळी वायूची गति अति सौम्य असते. असो; चित्त सर्व व्यवहारापासून उपरत झाले असता-चैतन्याचे ठायी वैषम्य मुळीच नाही, तर तें सर्वत्र सम आहे-असे शास्त्रतः जाणून, विचार व ऐकाय याच्या योगानें साक्षात्कारवान् झालेला योगी कोणत्याही दशेत व्यवहार करीत असला तरी सदा तुर्यवान्च असतो. सुषुप्तीत सौम्य झालेले प्राण जेव्हां भोगदायी कर्मीच्या योगाने चंचल होनात तेव्हां जीव.