या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४२ बृहद्योगवासिष्ठसार. चित् , त्या त्या भोगास अनुकूल असलेले प्राक्तन संस्कार जागे झाल्यामुळे, चित्तरूपानें उदय पावते. नंतर योगी आपल्या योगशक्तीने बीजातील पढ़ें विस्तार पावणारा वृक्ष जसा पहातो त्याप्रमाणे जीव आपल्यामध्ये असलेले जगजाल आंतल्या भात पण जाग्रत्-प्रमाणेच व्यवस्थितपणे पहातो. निज- लेला जीव वायूच्या योगाने जेव्हा किंचित् क्षुब्ध होतो तेव्हा मी आहे, असें तो पहातो व जेव्हा बराचसा क्षुब्ध होतो तेव्हा 'मी आकाशात गमन करीत आहे' असें तो पहातो. जेव्हा नाड्यातील श्रेष्मगत् जलाने सो भिजल्यासारखा होतो तेव्हा त्याला जलाचा भ्रम होतो. तो पित्ता- दिकाने जेव्हा व्याप्त होतो तेव्हा ग्रीष्मादिकाचा अनभव घेतो. साराश तो आतील उद्धन सरकाराप्रमणे आतल्या आत, बाहेर अमल्याप्रमाणे, सर्व पदार्थ पहातो. हृदयातच तो हे सर्व क्षोभ पहात असल्यामुळे स्वाम- समयी इद्रियछिद्रांत येत नाही. पढें वायूनें क्षोभ केला असता इंद्रियछिद्राध्या द्वारा तो बाह्य सृष्टि पाहू लागतो व त्या अवस्थेलाच मनींनी जाग्रत् हटले आहे. रामा; साराश याप्रमाणे हा सर्व मनाचा वेळ आहे, असें जाणन त या असत् जगा- मध्ये सत्य-भावना करू नकोम. कारण ती भावनाच आध्यात्मिकादि त्रिविध मरण व त्याम कारण होणारे दोष यास अवश्य सपादन कर- णारी आहे १९. सर्ग २०-मनाच्या स्वरूपाचे निरूपण व त्याला आत्मप्रवण करण्याचा उपदेश. श्रीवसिष्ठ-राघवा, मनाचे रूप कळावे ह्मणून मी तुला चार अवस्थाचे रूप सागितलें. जामत्-आदि चार अवस्थाचे वर्णन ऐकून मनाचा स्वभाव महज कळतो. दृढ भावित पदार्थाचा भाकार धारण करणे हा मनाचा स्वभाव आहे. अग्नीत घालून तापविलेला लोखडाचा गोळा जसा अग्नीसारखा होतो त्याप्रमाणे दृढनिश्चययुक्त चित्त ज्याची पुष्कळ मावना करिते, तद्रूप ते होते. यास्तव सत् व असदुप, प्राय व त्याज्य विषयी इत्यादि सर्व मन:कल्पनामात्र आहे. त्याना सत्यही ह्मणता येत नाही व असत्यही प्रणवत नाही. मन समष्टिव्यष्टिरूप असल्यामुळे ते व्यष्टिरूपाने मोहविषय जगाचे उपादान होते. मनच परुष आहे. यास्तव मोहकारी व्याष्ट- मनाला शुभ मागोत प्रवृत्त कर. मणजे त्याच्या विजयाने समष्गित मना- तील मणिमादि सिद्ध व तत्त्वबोध निश्चयाने प्राप्त होईल. शरीरच जर