या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. मी वसिष्ठ यांच्या शरीराचा भाव ) मिथ्या माहे. तो सत्य असल्यासारिखा जरी अनुभव आला तरी स्वप्नातील मरणाप्रमाणे असत्य आहे. मेलेला बंधु स्वप्नांत दिसला तरी तो जसा, जागे झाल्यावर, असत् स्याप्रमाणे तत्त्वदर्शनानंतर सर्व जगत् असत् होते. सत्य आहे असें निश्च- याने जाणणारा अतिमूढ होय. त्याला जग असत्य आहे असे सांगू लागल्यास ते मुळीच आवडत नाही. कारण परमार्थतत्त्व-विचारा- भ्यासावाचून जगत् सत्य आहे या अनुभवाचा अपलाप होणे शक्य नाही. चित्तात अतिरूढ होऊन वसलेला जगत्सत्यत्व-संस्कारही पुष्कळ दिवस तत्त्वाभ्यास केल्यावाचून जात नाही. म्हणूनच अनधिकान्यास जग असत्य असून ब्रह्म सत्य आहे असे सांगू लागल्यास तो 'हे वेड्याचे बरळणे आहे' असे समजून त्याची थट्टा करूं लागतो. मत्त व अमत्त याचे मतैक्य कसे होणार ? छाया व प्रकाश यांचा सहवास जसा अशक्य त्याप्रमाणे जगत्तत्त्वज्ञ व प्राकृत यांचा सहवास अशक्य आहे. प्राकृत पुरुषाला तत्त्वोपदेश, केवढाही प्रयत्न करून, जरी केला तरी हे विषयमय जग ब्रह्ममय आहे असा निश्चय त्याच्याने करवत नाही. प्रेताच्या चालण्याप्रमाणेच तो अशक्य आहे. यास्तव हे सर्व जग ब्रह्म आहे असे हवे त्याला सागत सुटू नये. वेदाध्ययन, तप, यज्ञ इत्यादिकांच्या योगानें ज्ञानाची योग्यता येत असते. यास्तव त्याचे अनुष्ठान ज्यांनी पूर्व. जन्मीं अथवा या जन्मी केलेले नाही त्यांना तत्त्वोपदेश करणे ह्मणजे आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करणेच आहे. तर मग तत्त्वोपदेशाचा खरा अधिकारी कोण ? म्हणून विचारशील तर पूर्वी सागितलेली गोष्टच पुनः सांगतो ऐक. अध्ययनादिकांच्या योगाने ज्यांचे चित्र शुद्ध झाले आहे व ज्यांच्या चित्तात वैराग्यादिभाव स्थिर झाले आहेत अशा अल्पबुद्ध पुरुषाला तत्त्वोपदेश करावा. कारण जो बुद्ध आहे त्याला मी बुद्ध आहे असा मुळी कधी अनुभवच येत नाही. तर तो सदा शांत ब्रह्माचाच अनुभव घेत असतो; त्याविषयी त्याचा दृढ निश्चय झालेला असतो; म्हणून त्याला बोध करण्याला अवकाशच रहात नाही. अझाला, त्याच्या विरुद्ध, जगांतील अनेक पदार्थाचा पदोपदी अनुभव येऊन ते सर्व सत्य माहेत असे निश्चयाने वाटते. म्हणून त्यालाही उपदेश करितां येत नाही. तेव्हां राहिला अल्पबुद्ध. त्याला जगाचेही भान होत