या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३३. ५७३ योगाने त्याच रुद्राची भाराधना केली. तथापि सोळावें वर्ष लागतांच, आयुर्मर्यादा संपल्यामुळे, सरोवराच्या काठी शिवलिगार्चन करीत असलेल्या नंदीला यमाने आपल्या पाशांनी बांधले. पण इतक्यांत साक्षात् शंकर तेथे प्रकट झाला व त्याने मृत्यूचे निवारण करून त्याला आपला अनुचर केलें. त्याचप्रमाणे बलिप्रभृति दानवांनी शुभोद्योगामुळेच, गज जसे कमलिनीचा विध्वंस करितात त्याप्रमाणे, सर्वोत्कर्षानें संपन्न असलेल्या देवाचे यथेच्छ मर्दन केले आहे. मरुत्त राजाच्या यज्ञात इंद्राने मोठे विघ्न केले असता संवर्त महर्षीने, साक्षात् ब्रह्मदेवाप्रमाणे, देव व अमुर यासह दुसरी सृष्टि निर्माण करण्यास आरभ केला हे प्रसिद्धच आहे. महा-निश्चयी विश्वामित्राने वारंवार उग्र व उग्रतर तप करून अलभ्य असलेलेही ब्राह्मण्य मिळविलें. पाण्यात कालवलेले पीठच दृच आहे असे समजून ते अमृताप्रमाणे प्राशन करणाऱ्या महा दरिद्री उपमन्यूला तपाच्या योगानें क्षीरसागर मिळाला, त्रैलोक्यातील महाबलाढ्य मल्लच अशा-ब्रह्मा, विष्णु इत्यादि थोरासही तृणाप्रमाणे गट्ट करणान्या काळाला श्वेत मुनीने अति तीव्र भनीने जिंकले. सावित्रीनामक राजकन्येने भयाच्या प्राणामागून जाणे, स्तुति करणे इत्यादि उपायानी यमाला प्रसन्न करून व यक्तीने वर मागून आपल्या सत्यवान्-पतीला परत आणले. तात्पर्य स्पष्ट फळ मिळत नाही असा कोणताही शास्त्रीय शुभ उद्योग नाही. यास्तव मुज्ञ पुरुषाने फलाच्या न्यूनाधिकतेचा चागला विचार करून सर्वोत्तम फलाकरिता शुभ प्रयत्न आरंभावा. आत्मज्ञान सुखदुःखादि सर्व दशाचे मूळ उपटून काढणारे आहे. यास्तव त्याच्याचकरिता सर्वोत्तम शुद्ध उद्योग करावा. प्रथम भोगाभिलापाचा नाश व्हावा म्हणन विषयाविषयी दोपदृष्टि चारण करावी. वैराग्यादिकाचा अभ्यास करताना आरभी मोटे दु.ग्य होईल, हे खरे, पण ते सहन केल्यावाचून अखड सुख कसे मिळणार ? चिदा मा पर ब्रह्म आहे, हे जरी खरे आहे, तरी कारणासह समार-अनर्थ-निवृत्तिरूप शमही परम पुरुषार्थच आहे यास्तव प्रथम पैराग्याभ्यासाने रागादि दोषाचे शमन करणे हे अखड ब्रह्मसुख देणारे आहे, असे तू समज. (प्रशम जसा साक्षात् स्पष्ट आनंद देणारा आहे तसे चित-ब्रक्य व्यक्त आनद देणारे नाही. यास्तव प्रशमाचाच उपयोग अधिक आहे, असा याचा भावार्थ).