या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यबहारप्रकरण-सर्ग ४. ५७ साप्रतकाली वो शोक व भय यास सोडून, शात चित्ताने, मोहरहित व कल्पना- शून्य होऊन राहिला आहे यास्तव तो जीवन्मुक्तच आहे. द्रव्य, बधु, वय, कर्म, विद्या, ज्ञान, इत्यादिकाच्या योगाने सर्वच भूते सारखी नसतात. काही शेकडों जन्मानतर ज्ञानी होतात तर कोणी होत नाहीत. या सृष्टीत सर्वत्र विलक्षणता दिसते. एक वस्तु दुसऱ्या वस्तूसारखी नाही व एकाचा स्वभाव दुसऱ्याच्या स्वभावासारखा नाही. या ईशशक्तीचा कसा चमत्कार आहे तो पहा. वस्तूसारखी वस्तु बनविणारे शिल्पी पु फळ आहेत. पण असख्य वस्तु निर्माण करून त्यात परस्पर विलक्षणता ठेवणे, हे विश्वक- ावाचून इतरास साध्य होणे नाही. तात्पर्य कालसमुद्रामध्ये हे असे अनत तरग उठणारच. त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून अतःकरणास धीर द्यावा, विकल्प सोडावा, आत्म्याच्या स्वरूपाकडे ष्टि लावावी, परम- शातिरूप अमृताने तृप्त व्हावे आणि अविद्येचे आवरण नाहीसे करून जीवन्मुक्त व्हावे ३. सर्ग ४--मुक्ताच्या दृष्टीने दोन्ही ( जीवन्मुक्ति व विदेह ) मुक्ती एकसारख्याच असतात, असे वर्णन करून मूळ दृढ होण्याकरिता शास्त्रीय पौरुषाची येथे प्रशसा करितात. श्रीवसिष्ठ-नित्य मुक्तता हाच आत्म्याचा स्वभाव आहे. पण त्याच्या या स्वरूपाचे ज्ञान न होणे, या अज्ञानामुळे त्यास बध होतो. तो त्याच्या ज्ञानानेच नाहीसा होणार, इतके वर सुचविले आहे. अज्ञानाचे पटल निघून गेले झणजे हा व्यवहार जरी दिसत असला तरी तो चित्रात काढलेल्या वाघाप्रमाणे करमणुकीच्या उपयोगी पडतो चित्रातील वाघा- प्रमाणेच तो पीडा करू शकत नाही मग असा जर खरा प्रकार आहे तर विदेहमुक्ति व जीवन्मुक्ति यात अतर कोणते राहिले ? बा प्रिय राघवा, जल व तरग हे नाममात्र भेद आहेत. तरग हा काही वस्तुत. जलाहून भिन्न पदार्थ नाही. त्याचप्रमाणे देहयुक्त व्यासमुनि व देहरहित शुक याच्यामध्ये नाममात्र अतर आहे वस्तुत. काहीं भेद नाही, कोणतीही मुक्त विषयाच्या अधीन नसते. हे सत्य आहेत, असे समजून विष- याचा जो स्वादच घेत नाही त्यास देहाचा किंवा दुसऱ्या कशाचाही अनुभव कसा येणार ? तो असग व उदासीन होऊन सर्वत्र आत्म्यासच पहात रहाणार ! हा मानश्रेष्ठ व्यास, आमच्या कल्पनेमुळे, देहयुक्त आहे व तो