या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८० बृहद्योगवासिष्ठसार. माझ्या प्रिय व सद्गुणी शिष्या, तुला दामादिकांचा न्याय प्राप्त न होवो. भीमादिकाचा न्याय तुझ्या ठायीं अचल निवास करो. ही दोन्ही आल्याने मला ब्रह्मदेवाने मागे सांगितली होती. असो; रामा, ही भयंकर संसार-वाट मोठमोठ्या सुख-दुःखमय कांव्यांनी दुर्गम झाली आहे. तथापि विषयांमध्ये आसक्त न होणे याच दृढ पादुका पायांत घालून तत्त्वबोधरूपी दंड हातात घेतला असता तिचे सहज उल्लघन करतां येते. यास्तव तूं निराश होऊ नकोस. प्रयत्न कर ३४. सर्ग ३५-सत्संग, विवेक, आत्मज्ञान व सामाधि यानी युक्त असलेला भोगेच्छ त्याग हाच शमाचा उपाय आहे. श्रीवासष्ठ-ज्यानी आपल्या विषयोन्मुख मनाला जिकले आहे त्या महाशूर साधूंचा जय-जयकार असो. सर्व उपद्रव देणान्या या ससाररूपी दुःखाच्या नाशाचा आपल्या मनाचा निग्रह करणे हा एकच उपाय आहे. ज्ञानसर्वस्व ऐकावे, त्याच्या अर्थाविषयी निश्चय करावा. पण इतके करूनही भोगेच्छा न सोडल्यास तो सर्व व्यर्थ खटाटोप होत असल्यामुळे मनो- निग्रहासाठी प्रथम भोगेच्छा टाकावी. कारण भोगाची इच्छा हाच बंध व तिचा त्याग हाच परपरेनें मोक्ष आहे. अनेक प्रथाचा भार वाहून काय करावयाचे आहे ? तू आधी एवढे कर-या सृष्टीत जे जे रम्य वाटेल ते ते सर्व विषाप्रमाणे अनर्थकर आहे असे समज. विचार न करिता सहसा केलेला विषयत्याग अति दुःग्वद होतो. पण चांगला विचार करून गुरु व शास्त्र यानी सागितलेल्या क्रमानें त्याग केला असता तो सकृदर्शनी जरी थोडासा कडु वाटला तरी परिणामी महामुख देतो. चित्तात भोग- वासना असल्या म्हणजे त्या पुनः पुनः विषयाचे स्मरण करून देऊन राग-द्वेषादि दोपास उत्पन्न करितात. जी मति वासनाजाळ्यात अडकलेली नसते व त्यामुळे जी रागादि दोपरहित असते ती चाचल्यरहित होऊन हळु हळु शात होत जाते. जशी चांगली जमीन नानाप्रकारचे धान्य प्रसवते त्याप्रमाणे शुभमति, ज्याच्यापासून ग्लानि कधीही येत नाही, अशा शांति, दाति, इत्यादि सद्गुणयुक्त व ज्ञान-समाधि-विश्रांति-लक्षण मोक्षफल देणारे अकुर प्रसवते. शुभ भावाचें अनुसंधान केल्यामुळे मन प्रसन्न झालें असतां, मिथ्या अज्ञानरूपी महा मेघ हळु हळु शात शाला असतां, शुक्लपक्षांतील चंद्राप्रमाणे सौजन्य वृद्धि पावलें असता,