या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३५. आकाशांत जसें सूर्याचे तेज त्याप्रमाणे पुण्यकारक विवेक पसरला असतां, वेळूतील मोत्याप्रमाणे अंतःकरणात संतोष अथवा इद्रियनिग्रहाचे धैर्य प्रष्ट होऊ लागले असतां, वसत-ऋतूंतील चंद्राप्रमाणे आत्मसौख्याचा लाभ झाल्याने मानसिक स्थिति कृतार्थ झाली असतां, सत्सगरूपी सफल व शी- तळ छायाप्रधान वृक्ष फळास आला असता, आणि समाधिरूपी देवदारुवक्ष आनंदरूपी सुरसाचा स्राव करू लागला असता, मन निद्व, निष्काम व निरुपद्रव होते. चापल्य, अनर्थ, शोक, मोह व भय या रोगानी रहित होते. शास्त्रार्थाविषयींचे त्याचे सर्व सदेह क्षीण होतात. विचित्र विषय पहाण्याची उत्कंठा नाहीशी होते. कल्पनाजालाचे निरसन होते व तें (मन) मोहशून्य बनते. ते इच्छाराहत, दयाभावरहित, निरपेक्ष, प्रवृत्त्युन्मु खतारहित, आधिरहित, शोकरहित, असक्त व आसगशून्य होते. आत्मा कसा आहे, तो कोणता ? कोणत्या साधनानें प्राप्य आहे, ज्ञान म्हणजे काय, साधनें कोणती इत्यादि अनेक वाद्याच्या भिन्न भिन्न कल्पनामुळे उत्पन्न झालेले अनेक सदेह हेच उग्र पुत्र, अनेक मनोरयरूपी आप्त, तृष्णारूपी स्त्री व स्थूल शरीररूपी पिजरा, यानी युक्त अशा आपल्याला (मनःस्वरूपाला) मारूनच ते आत्मसबधी ऐश्वर्य ( म्हणजे पुरुषार्थ) प्राप्त करून घेते. (आता मन कोणत्या क्रमाने आपला नाश करून घेतें तें सांगतो.) प्रथमतः आपल्या पुष्टीला कारण होणाऱ्या संकल्पास ते सोडते. हा माझा मित्र आहे, हा शत्र आहे, हे चागले आहे, हे वाईट आहे इत्यादि प्रकारचे विकल्प मनाला पुष्ट करीत असतात. यास्तव यांना उत्पन्न करण्यास जसे मी समर्थ आहे तसेंच याचा निग्रह करण्यासही मी सगर्थ आहे, या गोष्टींचे स्मरण करून ते आपल्या देहाकार कल्पित रूपास तृणाप्रामाणे टाकून देते. म्हणजे जोपर्यत देहाहभावाने वासित झालेले मन देहाकार होत असते तोपर्यतच देहास अनुकूल असलेल्या विषयाचे ठायीं राग व प्रतिकूल असलेल्या विषयाविषयों द्वेष त्याला वाटतो व रागद्वेषामुळे सहस्र वधि विकल्प उठून ते वाढते. पण तोच देहाहभाव नाहीसा झाला म्हणजे 'बीज नास्ति कुतः शाखा ' बीज नाही मग शाखा कोठच्या या न्यायाने रागादिकाचा क्षय होऊन ते स्वतःही क्षय पावते. पण-तें स्वतःच आपल्यावर असा अनर्थ कसा ओढवून घेईल ? म्हणून म्हणशील तर सांगतो. आत्मभूत मनाचा उभ्युदय म्हणजेच आत्मनाश असून