या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९४ बृहद्योगवासिष्ठसार. वद्धि कशा पावतात व त्यामध्येच लीन होऊन कशा राहतात ते मी तुला थोडक्यात सागतो. निर्मल ब्राह्मी चिच्छक्ति यहच्छेने कल्पना करून जीव. रूप होते. नंतर तें जीवरूपच सकल्प-विकल्पवशात् मन बनते. मन संकल्पाने एका क्षणात ब्राह्मी स्थितीचा त्याग केल्याप्रमाणेच जणु काय तिला विसरून हे सर्व दृश्य पहाते. चित् स्वप्रकाशपूर्ण आहे. पण त, प्रत्यक्-अतरदृष्टि सोडून पराक्-(बहिर ) दृष्टि झाली म्हणजे आपल्याच स्वरूपाला शून्यरूप पाहूं लागते. तेच सर्व लोकास दिसणारे आकाश होय. त्यातच ती, प्राक्तन वासनानुरूप, सृष्टिकर्ता ब्रह्मा व चतुर्दश भुवनां तर्गत प्राण्यांसह भुवनें केवळ सकल्पाने निर्मिते. याप्रमाणे ही सर्व सृष्टि चित्तनिर्मित आहे. त्यामुळेच ती सकल्पमय नगराप्रमाणे भ्रातिरूप व असत् होय. त्यातील काही वृक्ष-पाषाणादि भूतजाती महामोहमय अम- तात. सनकादि मुनींसारख्या काही मुनींच्या जाती ज्ञानसंपन्नच उद्भव- तात व इतर सर्व मध्येच हेलकावे खात रहातात. कारण वैराग्य नस. त्यामुळे त्याना परमात्म्याचे ज्ञान होत नाही. या भूलोकी मनुष्य-योनीत उत्पन्न झालेल्या जीवाना अनेक रोग, दु., मोह, द्वेप, भय इयादिकाचा साक्षात् अनुभव येत अमल्यामुळे व त्याचे स्मरण ठेवून त्याविषयी विचार करण्याचीही योग्यता असल्यामुळे ते सर्वच वैराग्यसंपन्न व उपदेशास पात्र व्हावयास पाहिजे होते. पण त्याच्यामध्ये बरेच जीव ताममी प्रकृतीचे असतात. त्यामुळे त्याना पशुहत्तींतच मोठा आनद बाटतो. मानवयोनीत काही राजस-सात्त्विक प्रकृतीचे लोक उत्पन्न होतात! पण त्यातही वैराग्यमपन थोडे. तथापि त्याचे वर्णन मी बेचाळिसाव्या सगीत करीन. अमृत ब्रह्म चिदाभासरूप जीव कसे झाले ? तेंही तेथेच सांगेन. स्पंदरहित परमात्म्याच्या सत्तेच्या एकदेशापासून, समुद्रातील तरगांच्या चाचल्याप्रमाणे, जीवस्पद कमा उद्भवतो तेही तेथेच अधिक स्पष्ट करून मागेन. पण आना अगोदर अनत आत्मतत्त्वाचा एकदेश व तेंच (आत्मतत्त्वच ) विकार पावते असे कमें म्हणता येते, ते सांगतो. गमा, हे जग त्याच्या योगाने झाले, त्याच्यापासून झाले इत्यादि वाक्यांची रचना केवल शास्त्रव्यवहाराकरिता केलेली असते. ती सत्य नव्हे. विकारिता, अवयविता, सत्ता, देशता इत्यादि भाव साक्षात् दिसत जरी असले तरी परमात्म्याचे टायी समवत नाहीत. परमात्म्यावाचून