या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ बृहद्योगवासिष्ठसार. विनय, सत्समागम इत्यादि सर्व उत्तम सामग्रीने युक्त होऊनहीं तुच्छ विषयलंपट बुद्धीनें पुनः तिर्यग्-योनीत पडतात व पशु-पक्षी इत्यादि तिर्यग- योनीतून ते नरकांतही जातात. कित्येक महा बुद्धिमान् संत ब्रह्मपदापासून उत्पन्न होऊन एकाच जन्माने संसारातून मुक्त होतात सारांश या विस्तीर्ण सृष्टीत प्राण्यांचा उत्कर्ष व अपकर्ष एकसारखा चालला आहे. या विस्तीर्ण जगाप्रमाणेच दुसरीही अनत जगें साप्रतकाळी आहेत. आजपर्यत होऊन गेली आहेत व पुढे होतील. विचित्र हेतूने विचित्र सृष्टी उद्भवतात व नाश पावतात. इतर ब्रह्माडातही कोणी गंधर्व होतो, कोणी यक्ष बनतो, कोणी देवत्व धारण करितो व कोणी दैत्य होतो. हे प्राणी या ब्रह्माडात जसे व्यवहार करीत राहिले आहेत तसेच ते इतर ब्रह्माडातही असतात. पण त्याच्या शरीररचनेत अतर असते. आपापल्या सात्विक, राजस व तामस स्वभावा- प्रमाणे व्यवहार करणाऱ्या त्याच्यामध्ये एकाच विषयाविषयी स्पर्धा लागून एकमेकाच्या सघर्षामुळे सष्टीचे परिवर्तन होते. व्यक्त होणे, गुप्त होणे, वाढणे, लीन होणे इत्यादिकाच्या योगाने, नद्याच्या लाटाप्रमाणे, सष्टीचे परिवर्तन होते. दीपापासून जसा उजेड, सूर्यापासून जसे किरण, अग्नी- पासून जशा ठिणग्या त्याप्रमाणे परमात्म्यापासून सतत जीवराशी उद्भ- वतात. कालामुळे हाणान्या विचित्र ऋतप्रमाणे, पुष्पापासून सुटणाऱ्या वासाप्रमाणे व मेघांतून पडणान्या शीतळ तुषाराप्रमाणे वारंवार उत्पन्न होऊन व देहपरपरा भोगून त्या ( जीवराशी) प्रलयसमयी बीनावस्थेत लीन होऊन रहातात. तात्पर्य, हे रामभद्रा, समुद्रातील लाटाप्रमाणे परमपदी ही त्रिभुवन- रचनादि महामाया व्यर्थ उत्पन्न होऊन वृद्धि पावते व नष्ट होते. हिचा हा क्रम सतत असाच चालू आहे ४३. सर्ग ४४-मुक्ति व प्रळय याचे बहुतेक साम्य असले तरी त्यातील विशेष व पिरिचा जीवाचा शरीर-धारण क्रम श्रीराम-गुरुवर्य, प्रळयसमयी जीवाला आपोआप आत्मस्थिति मिळत असते व आत्मास्थिति मिळणे म्हणजे मक्त होणेच आहे. मग एकदां बह्म- मय झाल्यावर पुनः त्याला शरीर का घ्यावे लागते? श्रीवसिष्ठ-याचे उत्तर मी तुला पूर्वीच (प्रकरण ४ सर्ग १८ पृष्ठ ५३६) दिले आहे. पण तें तुझ्या ध्यानांत राहिले नाही, असे वाटते. असो;