या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०४ बृहद्योगवासिष्ठसार. पण ही दोन्ही भूतें अपंचीकृत असल्यामुळे सूक्ष्म असतात. त्यामुळे मनाने मर्यादित झालेल्या चैतन्यरूप जीवास प्रत्यक्ष दिसत नाहीत. पुढे त्यांची वृद्धि व परस्पर संघर्ष झाला म्हणजे अग्नि उद्भवतो. त्यानंतर याच क्रमाने सूक्ष्म जल व पृथ्वी यांच्या भावास मन प्राप्त होते. तेजाचा गुण रूप व इद्रिय चक्षु.जलाचा गुण रस व इंद्रिय रसना. पृथ्वीचा गुण सुगंध भाणि इंद्रिय घ्राण आहे. असो; केवळ भावनेने सूक्ष्म पंच भूतानी वेष्टित झालेलें मन हळु हळु सूक्ष्मतेस सोडून, आकाशात स्फुरण पावलेल्या अग्निकणाकार शररािस पाहते. ते अहकारकला व बुद्धीचे बीज यांनी युक्त असते. त्यालाच पुर्यष्टक असे म्हणतात. तें हृदयकमलात रहाते. त्यांत अस- लेलें मन तीव्र वेगाने स्थूल शरीराची भावना करूं लागले म्हणजे वाढ- णाऱ्या बेलफलाप्रमाणे ते स्थूल होते. मूशीत ओतलेल्या सोन्याच्या रसाप्र- माणे विमल आकाशात स्फुरण पावलेलें तें तेज स्वभावतःच आकार धारण करते. त्या तेजःपुज आकारात अनेक अवयव विकास पावतात. वर मस्तक, खालीं पाय, दोन्ही बाजूला दोन हात, मध्यभागी उदर, व त्याच्या आजुबाजूस दुसरे आणखीं उपयुक्त भाग उद्भवतात. याप्रमाणे हा ब्रह्मा मनोरथवशात् सशरीरी होतो. आपल्या वासनेमुळेच, पूर्व उपासने- प्रमाणे, मनन करणारे मन अगयुक्त होते. ऋतूप्रमाणे तें देहास पुष्ट करतें व याप्रमाणे काही कालाने तें स्थूल आकाराने प्रकट होऊन निर्मल शरीरी होते. ___ ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, धर्म, बल व शक्ति यानी युक्त असलेला तोच सर्व लोकपितामह ब्रह्मा होय. अद्वय ब्रह्मामध्ये तो जशा प्रकारच्या आपल्या सत्तेनें राहतो तशाच प्रकारच्या व्यावहारिक सत्तेने आपल्या अज्ञानाला चित्तलीलेने पचीकृत स्थूल भूताच्या आकाराने उत्पन्न करतो. कधी अपार आकाश, कधी (दैनंदिनप्रलयसमयीं) निर्मल जल, कधी (कल्पांतसमयीं) भयंकर भग्नी, कधीं (पृथ्वीला उत्पन्न केल्यावर व भूतोत्पत्तीच्या पूर्वी) काळें भोर वृक्षमय भरण्य इत्यादि अनेक कल्पना करीत तो प्रभु नाना आकार उत्पन्न करतो व त्यांचे पालन करतो. त्याचे शरीर हेच पहिलें शरीर व तोच पहिला शरीरी होय. तो ब्रह्मपदापासून अवतीर्ण झाला. त्याच्या अज्ञानामुळे परम- आनंदास विसरला व गर्भनिद्रा गेली असता त्याने भाप हे अवाढव्य शरीर पाहिले. प्राण व अपान यांच्या प्रवाहाने युक्त, पंचभूतांच्या पाच