या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ५. ६१ किवा उतावीळ होऊ नये. अथवा कटाळून शुभ प्रवृत्ति सोडू नये. शुभाच्या योगाने अशुभाचा नाश होतो; हे त्रिकाल सत्य आहे यास्तव सर्व आपत्ति सहन करून, देहदडास न जुमानिता, इष्टसिद्धि करून घ्यावी. दृढ निश्चयापुढे देवादिकही हात टेकितात. निश्चयी पुरुषास ते विघ्न करू शकत नाहीत. आपल्या उत्कर्षाकरिता प्रयत्न करणाऱ्या परुषामध्ये जोप- र्यत शौथल्यादि दोष असतात तोपर्यतच विघ्ने त्यास भिववितात. दोषाभावीं ती बिचारी तोडे काळी करून कोठे जातात ते समजतही नाही. शास्त्रीय पौरुष करीत असतानाही कधी कधी अनर्थ ओढवतो. पण तो प्राक्तन बलाढ्य पौरुषाचे फल आहे, असे समजावे. काल घडलेला दोप आपणास आज प्रयत्नाने घालविता येतो कालच्या बहु भोजनाने अजीर्ण झाल्यास आज लघन करून त्यास हटविता येते. हेच-प्राक्तनास वर्तमान प्रयत्नाने हटविता येते, असे ह्मणण्यास-पुरेसे कारण आहे. क- रिता आत्म्यास ससारातून सोडविण्याकरिता शम, दम, श्रवण इत्यादि उपाय योजावेत. सतत उद्यम करून पुरुपानी आपले पुरुष हे नाव सार्थ करावे. शैवाच्या परिभाषेप्रमाणे पशु होऊ नये. स्वर्ग व मोक्ष या दोन्ही परम सुखाची प्राप्ति यथाशास्त्र उद्यम केल्याने होतेच होते सिह आपल्या अग-सामथ्याने, मानसिक धयाने व सतत यत्न करून जसा पिजऱ्यातून निघून जातो त्याप्रमाणे, बा रामा, मनुष्यानेही या ससाररूपी पिजऱ्यातून निसटून जावे. आपला हा देह नाश पावणारा आहे, हे कधीही विसरू नये. पशुवृत्ति टाकून द्यावी. स्वतत्र होण्याची इच्छा धरावी व त्याकरिता मत्समागम व सच्छास्त्र याचा आश्रय करावा. विपयोपभोगा- मध्ये आसक्त होऊन, आपलेपणा विसरून, पुढे ओढवणाऱ्या अनर्थाकडे दुर्लक्ष्य करून, आपल्या सोन्यासारिख्या तारुण्याची माती करून घेऊ नये. त्याचा ऐहिक व पारलौकिक हिताकडे उपयोग करावा. तारुण्य हाच सर्व आयुष्यातील उत्तम काल आहे प्रत्यक्ष प्रमाणाचा त्याग करून जो अनु- मानाचा आश्रय करितो तो मूर्व आपले हात हेच सर्प आहेत, असे अनु- मानाने ठरवून त्यास तोडून टाकण्यासही कमी करणार नाही. लक्ष्मी दैववाद्याचे तोडही पाहण्याची इच्छा करीत नाही. यास्तव अगोदर विवेक करावा. नतर अध्यात्मशास्त्राचा विचार करावा. त्याच्या अर्थाकडे अनुसधान ठेवावे. आत्म्याचा साक्षा-