या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५२. ६१३ तसाच जगाचे आक्रमण करण्यासही समर्थ आहे. धनवान् लोक जसे चूडामणीला आपल्या मस्तकावर धारण करितात त्याप्रमाणे भुवनांतील सर्व नायक (ब्रह्मा-विष्णु-इद्र) त्याची आज्ञा शिरसा मान्य करितात. साहस करण्याची त्याला मोठी आवड असून नानाप्रकारचे आश्चर्यकारक विहार तो करितो. त्रिभुवनांतील कोणीही त्याला आपल्या अधीन करून घेतले नाही. समुद्राच्या लाटाप्रमाणे असलेल्या त्याच्या सहस्रावधी सख- दुःखदायी कर्माची गणना करण्यास कोण समर्थ आहे ? आकाश जसे मुठीत धरता येत नाही त्याप्रमाणे त्या अतिवीर्यवान् राजाचें वीर्य शस्त्रे. अग्नि इत्यादि कोणत्याही उपायानी कुठित करिता येणे शक्य नाही. त्याच्या अल्पप्रयोजनाकरिता सहस्रावधि सकल्पाने व्याकुल झालेल्या लीलेचे अनुकरण इद्र, उपेंद्र व शकरही अशतः सुद्धा, करूं शकत नाहीत. त्या राजाचे उत्तम, मध्यम व अधम असे तीन देह सर्व जगाचे आक्रमण करून रहातात आणि ते सर्व व्यवहार-क्रीडा करण्यास समर्थ आहेत. तीन शरीरानी युक्त असलेला तो अति विस्तृत अव्याकृताकाशात झाला. ज्याप्रमाणे एकादा पक्षी क्रमाने आकाशातच अडे, पिंड व पख या तीन शरीरानी युक्त होऊन उत्पन्न होतो व सर्वतः भयभीत होऊन पिंपळादिकाची निःसार फळे खाण्यात गुतला असता एकाएकी खट् , खुट् असा थोडासा ध्वनि होताच ( तो शब्द का झाला ? कोठून झाला याचा विचार न करिता) उडून जातो त्याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन शरीरानी युक्त असलेला तो खोत्थ, ब्रह्माकाशात उत्पन्न होऊन. सर्वतः भयभीत होत्साता तुन्छ विषयात आसक्त होतो व विवि-निषेधरूप शब्दाप्रमाणे चेष्टा करूं लागतो. त्याच अपार आकाशात त्याने एक नगर (ब्रह्माड ) निर्मिले आहे. त्यात चवदा ( लोक किवा विद्या ) महामार्ग असन तीन भुवने अथवा वेद या भागानी ते भूषित झाले आहे. (नंदनादि ) वने व ( चैत्ररथादि) उपवने यानी ते युक्त आहे मेरु- मंदारादि क्रीडा पर्वतानी ते सुदर झाले आहे. मोत्याच्या पक्तीनी सपन्न असलेल्या सात ( समुद्ररूपी ) वापींनी ते भूषित झाले आहे. शीतळ व उष्ण प्रकाश देणारे (चंद्र-सूर्य) दोन दिवे त्यात लाविले आहेत. शास्त्रीय कर्मानी मिळणारी ऊर्ध्व गति व अशास्त्रीय आचरणाने प्राप्त होणारी अधोगति यानी त्यांतील बाजाराचा मार्ग सदा वहात असतो. असो