या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५४. ६३१ होते. संकल्पच मन, जीव, चित्त, बुद्धि व वासना आहे. त्यांचा भेद नाम- मात्र आहे. अर्थतः नाही. यास्तव संकल्प क्षीण झाला म्हणजे मन-जीव इत्यादि सर्व भाव क्षीण होतात. सकल्पच सर्व आहे. यास्तव त्याला हृदयां- तून तोडून टाक. असा कष्टी का होतोस ? या आकाशाप्रमाणेच हे जगही आहे. कारण ती दोन्ही असन्मय सकल्पापासून झाली आहेत. पण संकल्प सोडल्यावर सर्वच सकल्पमय असल्यामुळे सर्वांचाच अभाव होतो व त्या कारणाने शून्य रहाते असे म्हणू नये. कारण सकल्प व त्याचे कार्य विवर्तरूप आहे. त्यामुळे विवर्तरूप मृगजळ अथवा रज्जुसर्प निवृत्त झाला तरी त्याचे अधिष्ठान ( मरुभूमि व दोरी) जसें रहाते त्याप्रमाणे सक- ल्पादिकाची निवृत्ति झाली तरी दृक्-आत्मा अवशिष्ट रहातो. नंतर एकदा बाधित झालेल्या अर्थाविषयी (मिथ्या ठरलेल्या विषयाविषयी ) पुनः भावनाच उद्भवत नसल्यामुळे त्याचा पुनः उद्भव होत नाही. यास्तव भावनेचा उच्छेद करण्याची ज्याला इच्छा असेल त्याने प्रथम जग मिथ्या आहे, ही कल्पना अभ्यासाने दृढ करावी ह्मणजे शरीर व त्याचे सबधी पुत्रादि याच्या सुख-दुःखाने सुखी व दुःखी होण्याचा प्रसंग येत नाही. हे सर्व मिथ्या आहे, असा निर्णय झाला म्हणजे कोणत्याही वस्तूविषयी स्नेह अथवा आस्था वाटत नाही. आस्थेच्या अभावी हर्ष, शोक, क्रोध, भव, अभव इत्यादि काही होत नाही. मनच चित्प्रतिबिबामुळे जीव होऊन जगत् या नावाचे मानस नगर रचीत व त्याचा विनाश करीत राहिले आहे. ते विषयसंबंधामुळे त्याच्या त्याच्या वासनानी युक्त व अधिष्ठान- चित्संबधामुळे स्फरण-शक्तियक्त होऊन राहिले आहे. त्यामुळे मलिन व चल होऊन तें ही सर्ग-व्यवस्था करू शकते. असे जर आहे तर ते आपल्याला इष्ट असेल तेंच का करीत नाही, अनिष्ट का करिते ? म्हणून म्हणशील तर त्याचे कारण सागतो. जीव म्हणजे हृदयरूप वनातील एक मर्कट आहे. त्यामुळे तो आपल्याला अनुरूप अशीच क्रीडा करीत असतो. जीवमर्कट एका क्षणात दीर्घ आकार घेऊन तत्काल -हस्वही होतो. संक- ल्पजलावरील तरंगाचे नियमनही करता येत नाही. विषयांच्या दर्शनाने ते वाढतात व विषयदर्शन आणि स्मरण यांचा त्याग केला असता क्षीण होतात. अग्नीची लहानशी ठिणगी थोड्याशा गवताचें सहाय मिळाले तरी जशी वाढते त्याप्रमाणे क्षुद्र विषयानेही संकल्प दीप्त होतात. त्याचे