या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५५. प्रदेशास संतप्त करीत होता. मला पहातांच तो महात्मा उठला. आणि पत्रासनावर बसवून त्याने माझी फल पुष्पमिश्रित अर्ध्यादि उपचारांनी पूजा केली. नंतर पुत्राच्या बोधाकरितां दाशूराने पूर्वीच चालविलेली व संसारांतून तरून जाण्यास समर्थ असलेली ब्रह्माचर्चा मी त्याच्याशी केली. तो वृक्ष पाहिला. त्याच्या आसपास अनेक मृगसमूह शातपणे बसले होते. तो लतामंडलाने परिवेष्टित झाला होता. त्याच्या पानावर पडलेले दवाचे थेंब चादण्यामध्ये मोत्यासारखे चमकत होते. त्याचे सर्व अंग पुष्पांच्या भाराने नम्र व शुभ्रही झाले होते. त्याच्या अंगावर चढलेल्या वेलींच्या मंजिया वान्याने हालू लागल्या म्हणजे त्याला काही अवर्णनीय शोभा येत होती. मुनींनी बाधलेल्या पर्णकुटीप्रमाणे त्याच्या अंगावरील लतांचे सुंदर मडप आपोआप बनले होते. हरणे आपली अंगें वेलींना घाशीत असत. त्यामुळे त्यांच्या पुष्पातील सर्व रज खाली पडून भूमि सुवर्णरेणूंनी युक्त असल्यासारखी दिसत असे. त्या महावृक्षानें आसपासच्या सर्व वृक्षाना तुच्छ करून सोडले होते. मोराच्या अंगावर पुष्पपरागांचा अति वर्षाव होत असल्यामुळे त्याची अगकांति बदलल्यासारखी दिसत होती. तो वृक्ष वसंत व वनदेवी याचे निवासस्थानच आहे, असे मला त्यावेळी वाटले. भ्रमराचा गुजारव तेथील शातीचा भग करीत होता. मुनीच्या प्रभावानें पक्षी त्याच्यावरील घरट्यात स्वस्थपणे निजले होते. वानर शाखां- वर डोकी टेंकून घोरत होते. मुळाशी डोळे झाकून झोप घेत बसलेल्या अनेक आरण्य पशूनी एकमेव-अद्वितीय-तत्त्वाचाच जणुं काय अनुभव घेण्यास आरभ केला होता. टवटवीत पानानी भरलेल्या त्या वृक्षावरील जीवाची सख्या, सृष्टीतील जीवसख्येप्रमाणेच, न कळण्यासारखी होती. त्याच्या खाली फळाची जणु काय शय्याच हातरली होती आणि त्या एकाच शय्येवर अनेक पशू बसून विश्रांति घेत होते. त्याची पिकलेली फळे वारंवार खालच्या प्राण्याच्या अंगावर पडून त्यांच्या एकाग्रसुखात यत्किचित् विघ्न आणीत असत. साराश हे रामा, तो कदंब म्हणजे एक मोठा राजाच असून अनेक जीव त्याच्या आश्रयाने आपले जीवित सुखाने घालवीत होते. वीर राजपुत्रा, अशाप्रकारच्या त्या अद्भुत वृक्षाला पहाणान्या माझी ती रात्र मोठ्या आनंदाने गेली. वृक्षाची शोभा पाहिल्यावर मीही दारू- राध्या पुत्राला विचित्र कथा सांगून भारमबोध केला. मामच्या परस्पर अशा