या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५६. झालेले आहे, असे म्हणतो. अकस्मात् झालेल्या वस्तूंवर मू/वाचून दुसरा कोणीही आस्था ठेवीत नाही. जग अत्यंत अभावरूपही नाहीं व प्रध्वंसाभावरूपही नाही. कारण अत्यंत अभावरूप वस्तु कधी दिसत नाही. जग प्रवाहरूपाने सदा दिसत असते. तसाच ध्वंस नेहमी उत्पत्तीच्या विरुद्ध असतो. त्यामुळे जग जर ध्वसाभावरूप असते तर त्याची वारंवार उत्पत्ति झाली नसती. ते आत्म्याप्रमाणे नित्यसत्ता-स्वभाव अथवा क्षणिक- सत्ता-स्वभावही नाही. कारण त्याचा प्रतिक्षणी परिणामरूप क्षय होत असतो. तेव्हा त्याला नित्यसत्ता-स्वभाव कसे म्हणावें ? त्याचप्रमाणे आदि व अत (भूत व भविष्य ) या अवस्थेत नसलेली वस्तु मध्य (वर्तमान) अवस्थेतही नसते, असा न्याय असल्यामुळे त्याला क्षणिकसत्तास्वभावही अनुमानाने ठरविता येत नाही. अथवा नियतिवशात् होणाऱ्या सर्गादिकाचे कर्तृत्व केवल सानिध्यामुळे, आत्म्याला आहे, म्हणून म्हणावे तर सृज्य (उत्पन्न करावयाच्या) पदार्थाविषयी अभिमान धरून त्याकरिता खेद करणे युक्त नव्हे. यास्तव ही भावाभावमयी अस्थिर, दीर्घ व मिथ्या दशा कशी तरी उद्भवली आहे. अनादि अनत कालाचा शंभर वर्षे हा अगदीच अल्प अश आहे. मग तेवढ्याशा अल्पकाल रहाणाऱ्या, मनुष्यादि शरीर- रूपी महा-आश्चर्याने युक्त होऊन, सर्व इद्रियादि-रहित असलेला आत्मा व्याच्या मागून काय म्हणून धावेल ? कधीही धावणार नाही. बरे जगातील भाव स्थिर आहेत म्हणून जरी समजले तरी त्याच्या ठिकाणी आस्था ठेवणे युक्त नव्हे. कारण ते सर्व स्थिर असल्यामुळेच त्याचे ग्रहण अथा त्याग करता येत नाही. असग चैतन्याचा जड वस्तूशी सबध होणेही दुर्घट असल्यामुळे जड जगाचे ठायीं आस्था ठेवणे अनुचित आहे. जगद्भाव भस्थिर आहेत, असे समजले तर त्याच्याविषयी आस्था बाळगणे मुळीच शोभत नाही. कारण अस्थिर पदार्थावरही आस्था ठेवू लागल्यास पाण्या- वरील फेंस गेला तरी रडण्याचा प्रसंग येऊ लागेल. आत्मा जगत्स्वभाव आहे. म्हणजे जन्म व नाश हे त्याचे स्वभाव आहेत, असे समजणे हाच भास्थाबंध आहे. पण तत्त्वविचार केला असता, जग स्थिर आहे अथवा अस्थिर आहे, यांतील कोणताही जरी पक्ष घेतला तरी, त्याविषयींची आस्था शोभत नाही. आत्मा सर्व-कर्ता मसूनही अकर्ता आहे, तो काही एक करीत नाही. प्रकाश देणा-या