या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३६ बृहद्योगवासिष्ठसार. दिव्याप्रमाणे तो उदासीन असतो. लोकांच्या दिनकृत्यांस कारण होणारा सूर्य जसा वस्तुतः अकर्ता त्याप्रमाणे तो ही भकर्ता आहे. भापल्या स्थाना- मध्येच स्थित असलेला सूर्य वस्तुतः कोठे जात नसतानाही लोक त्याला जाणारा समजतात त्याचप्रमाणे आपल्याच महिन्यामध्ये स्थित असलेला आत्मा कांहीं करीत नसतानाही करणारा आहे. अरुणाख्य नदीचे तीर खमावत:च पाषाणांच्या योगाने विषम व उदासीन असते व सखल प्रदे- शाकडे जाणे हाही जलाचा स्वभावच असतो. पण भिन्न भिन्न स्वभा- वाच्या त्या दोन वस्तूंचे सानिध्य झाले म्हणजे प्रवाहाची विषमता हे कार्य आपोआप होते. त्याचप्रमाणे आत्मा व माया याच्या सानिध्यामुळे जग हे कार्य झाले आहे. दृष्टांतांतील तीर व जलाचा पूर यातील कोणीही जसा प्रवाहविषमतेचा कर्ता नव्हे त्याप्रमाणेच आत्मा व माया यांतील कोणीही जगत्कर्ता नव्हे. तर हे कसे तरी झाले भासे दिसते. राघवा, असा विचार केला म्हणजे तर जगांत आस्था टेवणे अगदीच अनुचित माहे, असे वाटते. अलातचक्र, स्वप्न, भ्रम इत्यादिकांच्या ठायीं काय आस्था ठेवावयाची आहे ? अकस्मात् आलेल्या जंतंशी कोणी कधी मैत्री करीत नसते. भ्रमोद्धृत जगज्जाल आस्थेचे स्थानच नव्हे. चंद्राचे ठायीं उष्णतेची, सूर्याचे ठायी शीततेची व मृगजळाचे ठायीं खन्या जलाची आस्था जशी तूं ठेवीत नाहीस त्याप्रमाणेच या जगाच्या स्थितीचीही आस्था धरूं नकोस. यातील प्रत्येक पदार्थ स्वप्नपदार्थासारखा आहे, असें तू पहा. भावनामयी अतरास्था सोड व 'मी जो आहे तो आहे' असे समजून लीलेने व्यवहार कर. केवल आत्मसांनिध्यामुळे नियति विकास पावते. मेघांच्या सानिध्याने जशी कुड्याची झाडे फुलतात त्याप्रमाणे आत्म- सांनिध्यामुळे त्रिभुवन भाशेआप विकास पावते. सर्व इच्छारहित सूर्य आका- शात आला असता जसा लोकसमूह व्यवहाराचा होऊ लागतो त्याप्रमाणे परमात्मा चित्ताकाशात उदित झाला असता जगाक्रिया सुरू होते. रत्नाची इच्छा नसतांनाच जसा त्याचा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे निरिच्छ देवाच्या सचेनेंच जगद्गण उद्भवतो. यास्तव रामा, भारम्यामध्ये कर्तृत्व व अकर्तृत्वही स्थित आहे. निरिच्छ असल्यामुळे तो अकर्ता व केवळ सांनिध्याने कतो. सर्व इंद्रियातीत असल्याकारणाने तो सन्मय भारमा कर्ताही नव्हे व