या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4 उपशमप्रकरण-सर्ग ३. ६५७ त्याने प्रातःस्नानप्रति सर्व कली व संध्यावंदनादि उचित कमें आटोपन पसिष्ठांच्या घरी जाण्याकरितां भालेल्या लक्ष्मणादि भ्राते व अति माप्त भत्य य तो त्या मुनींच्या येथे गेला. तों तो आत्मपरायण मुनि एकातति समाधि लावून बसला आहे, असे त्यांना आढळले. तेव्हां रामाने मस्तक नम्र करून त्यांस दुरूनच वंदन केले व ते सर्व विनयसंपन्न राज. पुत्र बाहेर अंगण्यांतच उभे राहिले. इतक्यात चांगलें उजाडून भगवान् भास्कर क्षितिजावर आला. तों ब्रह्मलोकास जसे देव जातात त्याप्रमाणे इतर राजे, राजपुत्र, ऋषी व ब्राह्मण त्या मुनींच्या येथे आले. वसिष्ठाच्या घरात गर्दी झाली. क्षणात भगवान् वसिष्ठ समाधि सोडून उठले. नम्र झालेल्या त्या सर्वोच त्याने विनयादि आचार व प्रिय भाषणादि उपचार यांच्या योगानें स्वागत केले. नंतर विश्वामित्रासह तो मुनि सज्ज असलेल्या रथावर आरूढ झाला व देवासह ब्रह्मा जसा इंद्राच्या नगरास जातो त्याप्रमाणे त्या सर्व परिवारासह दशरथाच्या सभेस गेला. रथातून उतरून मनिवर्य सभेच्या द्वारापाशी आला आहे असे कळताच राजा दशरथ सिहा- सनावरून उठून त्याचा सत्कार करण्याकरितां पुढे गेला, सर्व सभेत गेले व आपापल्या उचित स्थानी बसले. सर्वाची दृष्टि वसिष्टांच्या तोंडाकडे लागली. सभेतील कलकल शब्द शांत झाला. स्तुतिपाठक गप्प बसले. परस्पर चालणान्या गोष्टी थाबल्या व ते सर्व स्थान अगदीं सौम्य झालें, त्या सभास्थानी नानाप्रकारची सुगंधी द्रव्ये उधळली होती व ताज्या पुष्पांचाही घमघमाट सुटला होता. वातायनातून सुवासिक पुष्पांच्या माळा टांगलेल्या असल्यामुळे प्रभात वायु सभेत प्रवेश करताना त्याचा सुगंध घेऊनच सर्वांच्या घ्राणेंद्रियास तृप्त करण्याकरितां येत होता. राजांच्या व नागरिकाच्या स्त्रिया जाळीच्या पडद्याच्या आंत पुष्पमय उचित आसनांवर येऊन बसल्या होत्या. तात्पर्य शीत, मद व सुगंध वायु, नानाप्रकारची पप्पं. अनेक परिमल द्रव्ये व उत्तम स्त्रीपुरुषांचे सुगंधी श्वासवायू यांच्या योगाने ते सभास्थान स्वभावतःच चित्तप्रसाद उत्पन्न करणारे झाले. त्यातूनही श्रवणेच्छेने सर्व व्यापार सोडून सर्व लोक स्वस्थ बसले भसता त्या दशरथाच्या सभेला समाधिस्थ ज्ञान्याच्या हृदयाचीच उपमा प्राप्त झाली ३.