या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५८ बृहद्योगका सिष्ठसार. सर्ग४-राजाने केलेली वसिष्ठांची प्रशंसा पसिनी रामास केलेले प्रश्न. रामान उत्तर व पुढील उपदेशाविषयी प्रार्थना. __ श्रीवाल्मीकि-याप्रमाणे सर्वत्र शांतता पसरली असता राजा दशर. मनीस म्हणाला, "प्रभो, काल उपदेश करीत असतांना आपल्याला झालले भ्रम रात्री घेतलेल्या विश्रांतीने कमी झालेना ? आनंददायी व शुद्ध भशा आपल्या उपदेशामृताने खऱ्या अमृत वृष्टीप्रमाणे भामी तृप्त झालो आहो. चंद्रकिरणासारख्या महात्म्याच्या अति निर्मल वाणी मोहाधकारास हटवून चित्तास शीतळ करीत असतात. ब्रह्मसुख देणाऱ्या साधूच्या उक्तींची प्रशसा करिता येणे शक्य नाही. त्या आत्मरत्नांस दाखविणा-या उत्तम दीप-ज्योतीच होत. ज्याच्यापासून युक्तिरूप लता उत्पन्न होतात तो सुजनरूपी वृक्ष वंद्य होय. चद्रकिरण जसे अंधकाराचा नाश करितात त्याप्रमाणे सजनाचे उत्तम उपदेश मानस, शारीर व इद्रियसबधी दोप घालवितात. शरत्काली नद्या जशा क्षीण होऊ लागतात त्याप्रमाणे गुरुवर्य, आमचे तृष्णा-लोभादि समारबध तुमच्या उत्तम वाणीनें क्षीण होऊ लागले आहेत. रसाजनाने ज्याची दृष्टि निर्दोष झाली आहे असे आधळेही ज्याप्रमाणे मवर्णादि वस्तंम पाहू लागतात त्याप्रमाणे,-बाह्य झणजे अनात्म वस्तूमध्ये भासक्त झाल्यामुळे आत्मदृष्टिशून्य झालेले-आम्ही निष्पाप आत्म्याचे दर्शन घेण्यास तयार झालो आहो. आमची संसार- वामना हळु हळु क्षीण होऊ लागली आहे. मुनिराज, आपल्या वाणीप्रमाणे मदाराच्या मजिन्या अथवा अमतसागराचे तरंगही आहाद देत नसतील. रावत्रा, जो दिवस अमल्या ब्रह्मवेत्त्याच्या पूजनामध्ये जातो तोच प्रकाश- युक्त जमून बाकीचे दिवस अंधकारमय आहेत, असें मी समजतो. यास्तव सत्पुत्रा, भातां मुनीना प्रकृत अर्थाविषयी प्रश्न कर. दशरथाने रामाला अशी अनुज्ञा दिली असतां रामाच्या सन्मुख बस. लेला उदारात्मा वसिष्टमुनि अमें म्हणाला.- श्रीवसिष्ठ-रामभद्रा, मी मागच्या प्रकरणांत काय सांगितलें तें तुझ्या स्मरणांत आहेना ? सत्त्वादि गुणभेदामळे विचित्र जीवजाती कशा उद्भवतात ते तुला आठवत असेलच. परमात्म्याचे सर्व, असर्व, सत् , असत् व सदा उदय पावलेलें असें चिन्मात्रस्वरूप तूं विसरला नसशीलच. विश्वेश्वरापासून हे विश्व कसे उत्पन्न झाले ते तुझ्या ध्यानात असेल असे