या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ७. त्या ( त्रिविधं पौरुषा )मुळेच अधोगतीस जातात. तात्पर्य पौरुष हेंच सर्व दशांचे कारण आहे. चित्त जरी अशुभामध्ये प्रवृत्त झालेले असले तरी त्यास शुभकर्मामध्ये प्रवृत्त करावें. या एका वाक्यांत सर्व शास्त्रांच्या अर्थाचा संग्रह झाला आहे. सर्व गुरु व सर्व श्रेष्ठ जनक आपल्या शिष्यास व पुत्रास सदां " शुभाचरण कग; त्यानेच तुमचे हित होईल," असा उप- देश करीत असतात. पौरुषापासून जर फल मिळणे शक्य नसते किवा दैव पौरुषाहून श्रेष्ठ असते, तर असा उपदेश कोणीही केला नसता. शिवाय पौरुषाची सिद्धि प्रत्यक्ष आहे, हे मी नुक्तेच सांगितले आहे. तर मग दैव आले कोठून व कसे? ह्मणून विचारशील तर सांगतो. प्राक्तन पौरुष प्रबल झाल्यामुळे जेव्हा दु.ख होते तेव्हा त्या अस्वस्थतेच्या प्रसगी प्राण्याच्या चित्तास समाधान व्हावे ह्मणून मुज्ञ पुरुष हा दैवाचा उपाय योजितात कारण दु.खाच्या वेळी समाधान मानून घेण्यास काहीतरी निमित्त लागते. ते नसल्यास प्राणी अधिक व्याकुळ होण्याचा फार संभव असतो. यास्तव दुःग्व महन करण्याचे धैर्य अगी येण्यास हा एक उत्तम उपाय आहे. अशा दृष्टीने या दैवाकडे पाहिल्यास त्यात कोणतीच हानि नाही. पण भोजन करणाराची तृप्ति होते, गमन करणारा इष्ट स्थळी जाऊन पोचतो, भाषण करणारा भाषणानेच आपला अभिप्राय दुसऱ्यास कळवितो, इत्यादि प्रकार प्रत्यक्ष पहात असतानाही दैवावर विश्वास ठेवून आळशी होऊन रहाणाऱ्या लोकाचा देव-हा भयकर रोग व प्रेवळ शत्रु आहे, असे झटल्यावाचून रहावत नाही. बुद्धिमान् पुरुप प्रयत्ना- नेच सकटातून पार पडतात. यास्तव प्रत्येकाने आपल्या बऱ्या-वाईट प्रय- नाप्रमाणे आपणास फल मिळणार-हा परम सिद्धात आपल्या हृदयावर खोदून ठेविला पाहिजे. देव दैव ह्मणून आक्रोश करणाऱ्या लोकांस मी असे विचारितों की जन्म, बाल्य, यौवन, जरा, मरण इत्यादिकाप्रमाणे प्रत्यक्ष म दिसणाऱ्या दैवाची सिद्धि तुझी कशी करणार ? सुखदुःखादि फलाच्या प्राप्तीवरून जर तुह्मी त्याची सिद्धि करणार असाल तर त्यात आमचे काही वेचत नाही. कारण फलप्राप्तीनतर ज्याची सिद्धि होणार, ते आहे ह्मटले काय व नाही मटले काय, सारखेच. कारण "ते आहे" मटले तरी सुखदुःख होणार व नाही झटले तरी होणार. वाघोबा हटले तरी खाणार व वाध्या झटले तरी खाणार. मग वाघ्या ह्मणून त्याच्याविषयींचा तिटकारा