या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १३. करावा. स्वर्ग, पाताळ व राज्य यांपासून जें जे काही मिळणे शक्य आहे तें तें सर्व प्रज्ञाकोशापासून प्राप्त होते. राघवा, घोर संसारसागरांतून प्रजच्या योगानेच पार जाता येते. दान, तप, तीथे, उपवास इत्यादिकाच्या योगाने नव्हे. भूमीवरील नरानाही दैवी सपत्ति प्राप्त होणे हे प्रज्ञा-पुण्य- लतेचेच फल आहे. प्रज्ञाबलानेच कोल्ह्यासारख्या क्षुद्रप्राण्यानी सिंह, हत्ती इत्यादि महा बलाढ्य पशूना आजवर पुष्कळदा जिंकले आहे. प्रज्ञावान्च स्वर्ग व मोक्ष यास योग्य होतो. सर्व वादी प्रज्ञेनेंच प्रतिवाद्यास जिंकतात. विवेक्याच्या हृत्कोशात असलेली ही प्रज्ञा म्हणजे चिंतामणीच आहे. कल्पलतेसारखी ही चितिलेले फळ देते. यास्तव असल्या या महाफल देणाऱ्या प्रज्ञेला तूं प्रत्यही वाढीत्र, म्हणजे तिच्या योगानेच तुला उत्तम पद लाधेल १२. सर्ग १३-जनकाच्या विचाराच्या दृष्टाताने चित्तशातीचा उपाय श्रीवसिष्ठ--रामा, जनकाप्रमाणे तूंही विचार कर. म्हणजे तुलाही तें पद मिळेल. जनकासारखे जे प्रज्ञावान् राजस-सात्त्विक शेवटचा जन्म घेतात त्यांना ते तत्त्व आपोआप कळते. सत्त्वगुणाच्या वृद्धीमुळे चित्त प्रसन्न होई तो इद्रिय शत्रूस एकसारखें जिकीत रहावे. चित्त प्रसन्न झाले की, त्यात देवाधिदेव परमात्माही प्रसन्न होऊन व्यक्त होतो व त्याचा साक्षात्कार झाला की सर्व दुःखदृष्टी क्षय पावतात. तो परात्पर देव साक्षात् दिसला म्हणजे मोहबीजाच्या मुष्टी व विविध भापत्तींच्या वृष्टी अशा या कुदृष्टी क्षीण होतात. जनकाप्रमाणेच तूही सर्व व्यवहार कर. पण तो करीत असतानाही आत शुद्ध प्रज्ञेनें आत्म्याचे अनुसधान ठेव. आतल्या भात सतत विचार करणाऱ्या व जग भगुर आहे, असे पहाणाऱ्या तुझा आत्मा योग्य समयीं प्रसन्न होईल. ससारास भ्यालेल्या पुरुषाना एका आपल्या प्रयत्नावाचून दैव, कर्म, धन, बाधव इत्यादिकातील दुसरे कोणीही धीर देत नाही. जे दैवपरायण व कृत्याच्या आरभीच कुकल्पना करणारे असतात त्यांच्या मंदमतीचे अनुकरण कधीही करूं नये. श्रेष्ठ विवेकानें आत्म्याला पहावे व विरक्त चित्ताने भवसागराला तरून जावें. रामा, भाकाशांतून पडणाऱ्या फलासारखी अनायासाने होणारी ज्ञान- प्राप्ति ही मी तुला सांगितली. ही फार सुख देणारी आहे. जनका. प्रमाणे विचार करणाराला ज्ञान आपोआप होते. 'हा मी. * ही