या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५. आहे तर मला हर्ष-विषाद कसा होतो, असे विचारशील तर सांगतो. चो परमार्थ सन्मात्राच्या भावनेने इतर सर्व पदार्याविषयींची भावना सोडतो तो हर्ष-विषादादि दोषांनी दूषित होत नाही. राग-द्वेषरहित व वासना- शून्य पुरुष मुक्त आहे. तो जें करतो, खातो, देतो, मारतो त्यांतील कशाच्याही योगाने सुखी किंवा दुःखी होत नाही. हे माझे कर्तव्य मला अवश्य केले पाहिजे, असे समजून व त्याविषयीची इष्ट-निष्टभावना सोडून जो कार्यामध्ये प्रवृत्त होतो तो कोठेच निमग्न होत नाही. हे सर्व चित्सत्तामात्र आहे, अशा निश्चयाने युक्त असलेलें मन भोगाभिमान सोडून शांत होते. वनामध्ये मासाच्या इच्छेने मांजर सिंहाच्या मागून जसें लपन लपत जात असते त्याप्रमाणे स्वभावतःच जड मन चित्-तत्त्वाच्या मागून धावत असते. सिंहाच्या वीर्याने प्राप्त झालेले मांस त्याचा अनुचर जसा खातो त्याप्रमाणे चित्-च्या वीर्याने प्राप्त झालेल्या दृश्याच्या ठायीं मन आसक्त होते. साराश असे हे असत् मन चित्च्या प्रसादाने जिवत रहाते. तें अद्वितीय आत्म्याला विसरून जगाच्या आकाराची भावना करते. म्हणजे जगदाकार होऊन जिवंत रहाते व त्याला जेव्हा आत्मस्मृति होते तेव्हा ते मनस्त्वाचा त्याग करते. शवासारख्या जड मनाची प्रकाशशक्ति व स्पदशक्तिही चित्-च्या अधीन असते. म्हणूनच चित्च्या ठिकाणची स्पंदकल्पना म्हणजे मनच होय, असें विद्वान् म्हणतात. स्पदशक्तीचा जो विलास तेच चित्त, चित्तवृत्ती व विषय होत. यास्तव मी चित् आहे, असे जो जाणतो तो शुद्ध चिन्मात्रच होतो. अर्थात् विषयरहित चित् हेंच सनातन ब्रह्म होय आणि विषययुक्त चित् हीच त्रिपुटीरूप कलना, कल- नाच मननामुळे मन होते. आत्म्याला विसरून कलनाच चित होते व जडासारखी व्यवहार करूं लागते. तात्पर्य चितच कलना होऊन कलनाच मागच्या अनुभूत विषयाच्या स्मरणाने चित्त व भावि विषयाकार कल्पनेने, संकल्प व विकल्प याच्या द्वारा, मन होते. याप्रमाणे शुद्ध चिति आपल्या मायाशक्तिवशात् जगदावास प्राप्त झाली आहे. गुरु, शास्त्र व भात्मविचार याच्या योगाने हे तत्व जोवर कळत नाही तोवर वास्तविक पूर्णानंदाद्वयरूप ज्ञात होत नाही. यास्तव शास्त्रविचार, तीन वैराग्य । इंद्रियांचा निग्रह यांच्या योगाने जडाकार कलनारूप अवस्थात्रय स्वमा. पासून चित्-ला निवृत्त करावे. शास्त्रजन्य सान व शमादि साधने यांच्या