या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १३. काय, पण नित्य चिदात्म्याचा स्वीकार न केल्यास कलनादिकांच्या अध्या- साचीच सिद्धि होणार नाही. आपल्यालाच ठकविणान्या अज्ञानी स्पंदालाच मन बनविलें आहे. पण स्पद ही अन्नमय कोशाच्या आत रहाणान्या प्राणमय कोशरूप वायूची शक्ति आहे, असें तूं समज. ती प्राणशक्ति सकल्पापासून उठलेली आहे. यास्तव ज्याचा सकल्पच समूळ नष्ट झालेला असतो त्या योग्यांची विषयाकाररहित चित् म्हणजे पारमार्थिक प्रभाच होय. पण तीच जेव्हां हा मी व हे माझें या आकाराची होते तेव्हा स्पद व चित् याचा ऐक्याध्यास होतो व अशारीतीने बनलेल्या जड-चित्- मिश्रित कलनेलाच जीव हे नाव प्राप्त होते. कारण जीव म्हणजे प्राणका. रण करणारा. या कलनेत प्राणधारणशक्ति असते. बुद्धि, चित्त याही त्याच असत् संकल्पाच्या मिथ्या सज्ञा आहेत. कारण मन, मति, बुद्धि व शरीर यातील काही सत्य नसून एक आन्माच सत्य आहे आणि सदा सर्वदा अमणारा तोच सब जग व कालक्रम आहे. तो आकाशाहूनही अधिक स्वच्छ अमून, आहे व नाही असा तोच. कारण तो आपल्याला व दुसन्याना प्रकाशित करीत असल्यामुळे 'आहे, आणि स्थूलता व रूपादि यानी रहित असल्यामुळे ' नाही.' आत्म्याचा अनुभव स्वानुभवानेच येतो. त्याच्या टायी स्थौल्यादि वर्म नसल्यामुळे तो बाह्य इंद्रियाचा विषय होत नाही, अमें जरी मानले तरी सूक्ष्मार्थाचा निर्णय करणा-या मनाला त्याच्या ठिकाणी प्रवृत्त होण्यास कोणता प्रतिबंध आहे ? म्हणून विचारशील तर सागतो. त्याच्या दर्शन- समयीं मन जर स्वत: नष्ट झाले नसते तर ते त्याच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असते. पण ते स्वतः अविद्येचे कार्य असल्यामुळे आत्मदर्शन- क्षणींच अविद्येसह क्षीण होते. म्हणून ते त्याला पाहू शकत नाही. उजेड आला की अंधकार कसा रहाणार ? तर मग मनाची प्रवृत्ति कोठे होते ? म्हणन विचारशील तर तेही सागतो. ज्या दशेत अति स्वच्छ आत्मरूप- सवित् सकल्पोत्पन्न बाह्य विषयास प्रकाशित करूं लागते त्या दशेत भा- त्म्याचे विस्मरण व चित्तजन्य मिथ्या पदार्थांचे स्मरण होते. अर्थात् अशा वेळी अनात्म पदार्थाचे ठायी त्याची प्रवृत्ति होते. परात्पर पुरुषाने संकल्पमय होणे हेच चित्त होय. त्यामुळे संकल्प सोडणे हाच चित्ताभावाचा उपाय आहे आणि अशा चित्ताभावामुळेच मोक्ष होतो. म्हणजे आत्मदर्शन मनाच्या उत्पत्तीलाच प्रतिकूल आहे. चित्ताचा जन्म हेच संसाराचे बीज