या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५० योगाभ्यासाने प्रकदा हुसकून लाविलें म्हणजे भयाला अवकाशच रहात नाही. रामा, तूं चित्तांत केवल भ्रांतीने उद्भवलेल्या अहंकाररूपी महा बलाढ्य वेताळास यथार्थ ज्ञान-मंत्राने मार. देहगृहांतून भयंकर चित्तपक्ष गेला म्हणजे मग तुला कशाचेही भय नाही. मी निष्काम व सुखसाधनो- पार्जनशून्य आहे, असे तुला वाटू लागले म्हणजे तुझी चित्तसचा गळली आहे असें जाण व नंतर तसाच शात रहा १४. सर्ग १५-तृष्णेचे वर्णन. श्रीवसिष्ठ-आत्मा या चित्तसत्तेचे अनुकरण करू लागला म्हणजे तो आपल्या ब्रह्मात्मभावास विसरतो व चित्तानें कल्पिलेला देहादिच मी आहे, असें तो जाणतो आणि विषयाविषयींच्या राग-द्वेष-वासनास धारण करतो. नतर विपलतेसारखी मरण-मूर्छादि अनेक भ्रम देणारी तृष्णा त्या कलना-मल धारण करणान्या आत्म्यास मून्छित करते. तिन्या- पासून मुखलेशही मिळत नाही. तृष्णा जेव्हा जेव्हां उदय पावते, तेव्हा तेव्हा ती जीवाला महा मोहात पाडते. कल्पाग्नीच्या ज्वालाचा दाह सहन करण्यास हरि-हरादि समथे आहेत. पण तृष्णाग्नीच्या ज्वाला कोणाच्यानेही सहन करवत नाहीत. तृष्णा ही घोर सुरी आहे. सर्व दु.खें तृष्णा- वेलीची फळे आहेत. मानवाच्या मनोरूपी बिळात रहाणारी ही जंगली कुत्री कोणाच्या दृष्टी न पडताच शरीरातील हाडे, मांस व रक्त खाते ती क्षणात उदय पावते व क्षणात नष्ट होते तृष्णेने वाला जजेर करून सोडलें आहे तो दीन, निरुत्साह व निर्बल होऊन रहातो, तो अति नीच अवस्थेस पोचतो. मोहित होतो व रडत पडतो. ज्याच्या हृदयरध्रात तृष्णा नावाची काळी नागीण नसते त्या पुरुषाचे प्राणवायू स्वस्थ असतात. तृष्णानामक कृष्ण पक्ष संपला की पुण्यकारक शुक्ल पक्ष सुरू होतो. तृष्णा नावाच्या किडक्या वेळीने ज्या पुरुषवृक्षाला दूषित केलेले नसते त्याच्यावर सदा पुण्यपुष्षे फुलतात. विवेकदृष्टिहीन पुरुषान्या चित्तारण्यात तृष्णानदी मोठ्या वेगाने वहाते. सूत्रयत्रात बाधलेल्या पक्ष्यांप्रमाणे तृष्णा या सर्व जनांस फिरविते, मारते व सोलते. धर्म-ज्ञाना- च्या दया-विवेकादि सूक्ष्म अंकुरांनाही तृष्णाकुन्हाड तोडते. तृष्णेच्या मागे लागून जाणारा पुरुष एकाद्या पशूप्रमाणे खळग्यांत पडतो. हृदयांतील साक्षात् पिशाचीच अशी ही तृष्णा पुरुषाला जशी अंच करते तशी प्रौढ