या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९२ बृहयोगवासिष्ठसार. सर्ग १८-संसारात राहुनही दुखी न होणाऱ्या विद्वानांची स्थिति. श्रीवसिष्ठ-रामा, समाहितचित्त, काम-लोभादि कुदृष्टींनी प्रदूषित च लीलेने व्यवहार करणान्या महात्म्याचा हा स्वभाव ऐक. संसारविहार करणाऱ्याही जीवन्मुक्तमुनीने प्रारंभी जन्मादि दुःखांनी, मध्यभागी आध्या- स्मिकादि दुःखांनी व अंती मृत्यु-नरकादि दुःखांनी विरस असलेल्या जगत्-स्थितीस हसावें. तिला तुच्छ जाणावें. सर्व प्रकृत कार्यामध्ये उचित व्यवहार करणारा, शत्रुमित्रादिकांविषयी सम, ध्येयवासनात्यागाचा अवलंब करून रहाणारा, सर्वत्र उद्वेगशून्य, कोणाचेही अप्रिय न करणारा, विवेकी, ज्ञानलक्षण उपवनात रहाणारा, सर्वातीत पदाचा अवलंब करणारा, पूर्ण- चंद्राप्रमाणे शांतचित्त, उद्वेगरहित, व प्रिय वस्तूच्या लाभाने संतुष्ट न होणारा पुरुष संसारात दुःखी होत नाही. सर्व शविषयी उदासीन, दाक्षिण्य व दया यांनी युक्त, श्रेष्ठाचे प्राप्त कार्य करणारा, अभिनंदन, द्वेष, शोक व इच्छा यानी रहित, मित भाषण करणारा, अवश्य कार्यामध्ये आळस न करणारा, विचारले असतां उचित असेल तेच सागणारा, कोणी न विचारल्यास स्थाणूप्रमाणे स्तब्ध बसणारा, इष्टानिष्टभावशून्य, कोणी आक्षेप केला असता रम्य शब्दांनी समाधान करणारा, भूताचा आशय जाणणारा, पक्षपात न करणारा, परम पदी आरूढ झालेला व भंगुर जगस्थितीकडे अंतःशीतल बुद्धीने हसत अवलोकन करणारा ज्ञानी संसारात दुःखी होत नाही. ज्यांनी चिचाला जिंकलें भाहे अशा परावरज्ञ महात्म्यांचा हा खमा- चच आहे. पण ज्यांनी चित्ताला जिंकलेले नाही अशा भोगरूपी चिखलांत मतलेल्या मूखोंचे मनोरथ, चेष्टा व त्याचे परिणाम अनंत व मति विचित्र असल्यामुळे यांचे वर्णन करता येत नाही. त्याना स्त्रिया अतिशय अभि- मत असतात व भामाला त्या नरकामीच्या ज्याला माहेत, असे वाटते. स्यांना धन इष्ट असते, पण भाम्हांला ते सर्व अनर्थाचे बीज आहे, असे पाटते. ते पनादिकांच्या योगाने यज्ञादि सत्कर्मे करतील म्हणून म्हणायें तर त्यांची ती कहा साभिमान 4 सकाम होत असल्याकारणाने व दंभ, मान, मद, मात्सर्य इत्यादि दुराचारांनी भरलेली असल्यामुळे पुनर्जन्मादि- मुखदुःखांनी परिपूर्ण असतात. यामुळे भामहाला त्यांच्या स्वभावाचे वर्णन चांगडेसे करता येत नाही. यास्तव है रापपा, सही विद्वानांच्या चरित्रानेच बिहार कर. सर्व