या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १९. ६९५ चित्त न होता, त्यांच्या भौर्धदैहिक कर्मामध्ये निमग्न झाला व पावन दुःखी झाला. तो आपल्या ज्येष्ठ भ्रात्याप्रमाणे धैर्य न धरिता शोकानें व्याकुळ होऊन विलाप करीत अरण्यांतून इतस्ततः फिरूं लागला. पण भाईबापांच्या देहांस अग्निसंस्कार करून व त्यांचे योग्य और्षदैहिक कर्म करून उदारबुद्धि पुण्य दुःखी • पावनाकडे आला व त्याला मोठ्या प्रेमाने म्हणाला.- बाळा, तूं असा शोक का कारतोस. तुझा पिता मातेसह आपल्या मोक्षनामक परमात्मपदवीस प्राप्त झाला आहे. उत्पत्त्यादि सर्व काली मत्र प्राण्याचे तेच आधारभूत स्थान आहे. ब्रह्मवेत्त्याचें तें स्वरूप आहे. मग आपल्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या पित्याविषयीं व्यर्थ शोक का करतोस ? हाच माझा पिता व हीच माझी माता अशी मूढ भावना धरल्यामुळेच तुला अशोच्य माता-पितराविषयी शोक करण्याचा प्रसग आला आहे. पण तीच एकटी तुझी माता नाही व तोच एकटा पिताही नाही आणि आजवर ज्यांना असख्य पुत्र झाले आहेत, अशा त्याचा तूं एकच पुत्रही नाहीस. अरे बाळा, यापूर्वीही तुझी सहस्रावधि मातापितरे होऊन गेली आहेत व विचारपूर्वक, मोह सोडून, या जन्मी आत्मस्वरूपाम न जाणल्यास यापुढेही असख्य आईबाप होतील. त्याचप्रमाणे त्यानाही आजपर्यंत तुझ्या- सारखे असंख्य पुत्र झाले होते व ते सर्व नदीच्या तरंगाप्रमाण नाहीसे झाले आहेत. बाबारे, प्रत्येक ऋतूमध्ये वृक्षाना जशी अनेक फळे येऊन नाश पावतात त्याप्रमाणे प्राण्याचे अनेक मित्र, भात व बाधव प्रयेक जन्मी होऊन जातात. मग स्नेहामुळे त्याच्याविषयी जर शोकच करावयाचा म्हणून म्हटले तर त्या सवोविषयींच शोक करावयास नको का? (हीं आईबा याच जन्मी आता नुक्तीच मलीं आहेत व याच्या स्नेहाचे आणि उपकाराचे आम्हाला स्मरण आहे, म्हणून याच्याकरिताच मात्र शोक करून ज्याचे स्मरण नाही अशा इतर अनेक आईबापाकरिता आम्हाला दुःख होत नाही म्हणून म्हणशील तर दु:खाचे कारण आईबाप नसून त्यांचे स्मरण आहे, असे झाले. अर्थात् यांचेही विस्मरण झाले असता तू याच्या करिताही शोक करणार नाहीस, हे उघड आहे. यास्तव आताच यांना विसर. यांचे स्मरण करून उगीच कष्टी का होतोस ! ) अथवा जगाच्या स्थितीचा विचार कर. म्हणजे परमार्थतः तुझे कोणी मित्र नाहीत व