या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७०८ वृहद्योगवासिष्टसार. "इत्यादिकांच्या योगाने सुख होते, नाही असे नाही. पण ते विषयसुखच होय. ( व विषयसुख विनाशी असते, हे ठरलेच आहे ) यास्तव त्याच्या- पासून भोगवैराग्य उद्भवत नाही. तर ते आत्मभावाच्या साक्षात्कारानेच उद्भवते. भोगवैराग्याभ्यासरूपी पुरुषाच्या प्रयत्नावाचून दुसन्या कोणत्याही उपयाने बुद्धि आत्मदर्शनामध्ये प्रवृत्त होत नाही. भोगत्यागानें प्राप्त झालेल्या परमार्थावाचून ब्रह्मपद विश्रातिसुख मिळत नाही. कारण ते या आब्रह्मस्तबपर्यंत जगात कोठेही नसते. यास्तव दैवाला दूर सारून, पौष प्रयत्न करून, प्राज्ञ पुरुषानें परम कल्याणास प्रतिबंध करणान्या भोगांना तुन्छ करून सोडावे. कारण भोगाचा तुच्छ भाव दृढ झाला म्हणजे विचार उत्पन्न होतो. समुद्र व मेघ यान्याप्रमाणेच विचाराच्या योगानें भोगनिंदा व भोगनिदेने विचार पूर्ण होतो. भोगवैराग्य, विचार व शाश्वत आत्मदर्शन अति स्निग्ध मित्राप्रमाणे परस्परास वाढवितात पण त्यातूनही प्रथम दैवाचा अनादर करून पौरुप प्रयत्नाने ( दात आवळून ) भोग- विरक्ति सपादन करावी. उपायाने सर्व सुसाव्य होते. यास्तव मी आतां भोगविरक्तीचा उपाय सागतो. देशाचाराच्या विरुद्ध न जाता आप्तान्या समतीने व शुद्ध मार्गानें धन- सपादन करावे. नतर धनाच्या योगानें गुणशाली सुजनाची आराधना करून त्यास वश करून घ्यावें. (सत स्वतः विरक्त असतात. त्यामुळे त्याना प्रसन्न करावयाचे झाल्यास वस्तुत. द्रव्याची काही गरज नाही पण सन्मार्गाने मपादन केलेल्या द्रव्याचा सन्कृन्यात व्यय केलेला पाहूनही त्यास आनंद होत असतो. यास्तव सत्कात द्रव्यक्षय करून त्याचा प्रसाद संपादन करावा.) त्याच्या समागमानें भोगनिंदा प्रवृत्त होते. भोग सर्वथा निंद्य आहेत असे वाटले झणजे विचार उद्भवतो. त्यानतर ज्ञान व ज्ञानाच्या योगाने शास्त्रार्थसंग्रह होतो. नतर क्रमाने परम-पदप्राप्ति होते. पुत्रा, तूही याच क्रमाने प्रयत्न कर. विषयविरक्तीवाचून बाकीचे सर्व प्रयत्न निष्फळ आहेत. पण तूं विषयाचा त्याग करण्यास आजच जर समर्थ नसशील तर तुझें हें यौवन समाप्त होऊन वार्द्धक्य येईपर्यंत धीर घर. तोपर्यंत तूं श्रवण, विचार, ध्यान इत्यादिकाचा अभ्यास करीत रहा. वृद्धावस्थेत इंद्रियांच्या शैथिल्याबरोबरच विषयवैराग्य भाले मणजे विचार पूर्ण होऊन परम पद आपोआप हाती लागेल. तात्पर्य विषयो-