या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १०. ७१ करिता, बा धीरा, आता उगीच कल्पना व कुतर्क यात काल न घाल- विता अवश्य कल्याण करणाऱ्या पौरुषाचा आश्रय कर; व मी आणखी काय सागत आहे, ते चित्त एकाग्र करून ऐक. इद्रिये विषयांच्या अभि- लाषावर आरूढ होऊन मोक्षाच्या अलीकडे असणाऱ्या-म्हणजे मोक्षा- पुढे तुच्छ असलेल्या-ऐहिक व स्वर्गादि पारलौकिक विनाशी सुखामध्ये जाऊन पडत असतात. यास्तव, त्याचा मनोरथरूपी रथच तोडून टाक- ण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनोरथ व विषयाभिलाष याचा एकच अर्थ आहे. तो नाहीसा झाल्यावर इद्रियाची गतिच खुटली, असे समज. मनाला स्थिर केले की, मनोरय शात होता. यास्तव, अगोदर तू मनाचा निग्रह कर. मनाचे नियमन करणे हे एक मोठे कठिण काम आहे खरे; पण दृढ प्रयत्नाने ते केल्यावाचन गत्यतर नाही. मन स्थिर झाले असता या लोकी जीवन्मुक्ति व परलोकी विदेहमुक्ति देणारी व मोक्षाचे अनेक उपाय सुचविणारी ही साररूप सहिता तू ऐक पण ही सहिता ऐक- णारा उत्तम अधिकारी असेल तरच त्यास परमार्थप्राप्ति होईल. यास्तव श्रवणसमयी तू शाति व विरक्ति या दोन उत्तम गुणानी युक्त होऊन रहा. कारण त्यावाचून वक्त्याच्या पूर्वापर वाक्याचा सदर्भ, गर्भितार्थ, तात्पर्य इत्यादि श्रोत्याच्या ध्यानात येणार नाही, व मनाचे अनुसवान आत्म्या- कडेच रहाणार नाही. सासारिक सुख व दु.ख या दोघांचाही क्षय करून महा आनद देणारा हा मोक्षाचा उपाय मी तुला सागतो. या सर्व विवेक्यासह ही मोक्षकथा ऐकल्याने तू दुःखरहित व क्षयशून्य स्थानी जाशील. चित्तास परम आह्लाद देणारे हे तत्त्वज्ञान पर्वी परमेष्ठी पितामहाने सागितले. इतक्यात दशरथनदन हात जोडून ह्मणाला-स्वामिन् , त्या स्वयभू परमात्म्याने आपणास हे ज्ञान कोणत्या उद्देशाने सागितले ? व आपण ते कसे प्राप्त करून घेतलेत, ते मला सागा. यावर वसिष्ट ह्मणाले-रघुवीरा, मायेच्या अनत विलासाचा आधार, सर्वातर्यामी, व सत्तारूप चैतन्यात्मा आहे. तोच सर्व जीवाच्या हृदयातील प्रदीप होय. चैतन्यरूपाने त्याचे सर्वास भान होत असते. मायाकार्याची उत्पत्ति व लय या दोन्ही कालीं तो निर्विकार असतो. सागरात जसा तरग उत्पन्न न्हावा .त्याप्रमाणे त्या चैतन्यात्म्यापासून सर्व कार्यास व्यापून रहाणारा विराट् , सूक्ष्मभूताच्या उत्पत्तीनतर उत्पन्न झाला. त्या विष्णूच्या-मेरु हीच